Devendra Fadnavis: 'आज लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय', सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 02:37 PM2023-05-11T14:37:00+5:302023-05-11T14:47:48+5:30

'आजच्या निकालाने महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर पूर्णपणे पाणी फिरले आहे.'

Devendra Fadnavis on Supreme Court: 'Victory of democracy and public opinion today', Devendra Fadnavis satisfied with Supreme Court verdict | Devendra Fadnavis: 'आज लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय', सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस समाधानी

Devendra Fadnavis: 'आज लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय', सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस समाधानी

googlenewsNext

मुंबई- आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे तुर्तास शिंदे-फडणवीस सरकारला कुठलाही धोका नाही. या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुयंक्त पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. 

यावेळी फडणवीस म्हणाले की, आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल आम्ही समाधानी आहोत. आज लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्णपणे विजय झाला आहे. मला या निकालाच्या काही मुद्द्यांकडे लक्ष वेधायचे आहे. सर्वात आधी, या निकालाने महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर पूर्णपणे पाणी फिरले आहे. न्यायलयाने सांगितले की, उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

दुसरा मुद्दा म्हणजे, सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा संपूर्ण अधिकार अध्यक्षांचा असल्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अध्यक्ष यावर सुनावणी घेतील. तिसरा मुद्दा म्हणजे, ज्या आमदारांविरोधात अपात्रतेची याकिका आहेत, त्यांना त्यांचे अधिकार असल्याचे कोर्टाने म्हटले आहेत, असेही फडणवीस म्हणाले. 

ते पुढे म्हणतात, अजून एक महत्वाची बाब म्हणजे, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला पूर्णपणे अधिकार असल्याचे सांगितले आहे. निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो. आयोगाने घेतलेल्या निर्णयांवर उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केलेले प्रश्न पूर्णपणे चुकीचे आहेत. याशिवाय, राजकीय पक्ष कुठला, हे ठरवण्याचे अधिकार अध्यक्षांकडे आहेत. त्यामुळे आता हे सरकार पूर्णपणे कायदेशीर, संवैधानिक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. 

Web Title: Devendra Fadnavis on Supreme Court: 'Victory of democracy and public opinion today', Devendra Fadnavis satisfied with Supreme Court verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.