मुंबई - देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बुधवारी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गटनेतेपदी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. मुंबईच्या आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडेल. त्यात केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासह देशातील इतर राज्यातील एनडीएचे प्रमुख नेते उपस्थित राहतील.
आज शपथ घेणाऱ्यांमध्ये केवळ मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री यांच्या नावाचा समावेश आहे. परंतु इतर मंत्री शपथ घेणार की नाही याबाबत संभ्रम आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत खातेवाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीत मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावरून एकमत झालं आहे. केवळ खातेवाटप आणि नावांची घोषणा होणं बाकी आहे. राज्यात एकूण २८८ आमदार असून मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची मर्यादा ४३ इतकी आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची संख्या असू शकत नाही. गेल्या काळात महायुतीकडे २९ मंत्रिपदे होती, त्यात भाजपा-शिवसेना प्रत्येकी १० आणि राष्ट्रवादीकडे ९ मंत्रिपदे होती.
भाजपाची संभाव्य यादी
राधाकृष्ण विखे पाटीलसुधीर मुनगंटीवारचंद्रकांत पाटीलगिरीश महाजनपंकजा मुंडेचंद्रशेखर बावनकुळेरवींद्र चव्हाणमंगल प्रभात लोढाजयकुमार रावलदेवयानी फरांदेनितेश राणेआशिष शेलार
शिवसेनेची संभाव्य यादी
गुलाबराव पाटीलदादा भुसेशंभुराज देसाईउदय सामंतदीपक केसरकरभरत गोगावलेसंजय शिरसाटअर्जुन खोतकरयोगेश कदम
राष्ट्रवादीची संभाव्य यादी
धनंजय मुंडेदिलीप वळसे पाटीलछगन भुजबळहसन मुश्रीफआदिती तटकरेराजकुमार बडोलेमाणिकराव कोकाटेअनिल पाटीलधर्मराव आत्राम
अधिवेशनाआधी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्यात सध्या तरी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आमदारांच्या शपथविधीनंतर आणि अधिवेशनापूर्वी निश्चित होईल अशी माहिती माजी मंत्री अनिल पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.