शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शिवसेना नेत्याच्या 'अजान' स्पर्धेसंदर्भातील सल्ल्याने राजकारण तापलं; फडणवीस म्हणाले - हा बाळासाहेबांचा पक्ष नाही

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 01, 2020 9:39 PM

फडणवीस नागपूर येथे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावर बोलायला हवे. पांडुरंग सकपाळ यांनी नुकतेच उर्दू न्यूज पोर्टल बसीरत ऑनलाईनशी बोलताना अजान स्पर्धेसंदर्भात भाष्य केले होते.

नागपूर - शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या 'अजान' स्पर्धेसंदर्भात दिलेल्या सल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यावरून मंगळवारी भाजप नेते तथा राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा नाकारल्याचा आरोप केला. एवढेच नाही, तर शिवसेना आता 'वोट बँकेचे राजकारण' करत आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

फडणवीस नागपूर येथे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावर बोलायला हवे. पांडुरंग सकपाळ यांनी नुकतेच उर्दू न्यूज पोर्टल बसीरत ऑनलाईनशी बोलताना अजान स्पर्धेसंदर्भात भाष्य केले होते. फडणवीस म्हणाले, "ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही. या मुद्द्यावर ते नेहमी लढत राहिले आणि शिवेसना, बाळासाहेबांनी 'सामना'त लिहिलेल्या त्यांच्या लेखांच्या आणि वक्तव्यांच्या बरोबर उलटे कार्य करत आहे."

एका प्रश्नावर फडणवीस म्हणाले, "आम्ही मुस्लीम समाजाकडे कधीही व्होट बँक म्हणून पाहिले नाही. तसेच आम्हाला तुष्‍टीकरणाचे राजकारण नकोय. मुस्लीम समाजही 'सबका साथ, सबका विकास'चा भाग आहे."

अहो पक्षप्रमुख, खरंच मर्द असाल तर... -यासंदर्भात, नितेश राणे यांनीही, ट्विट करत म्हणाले, "आहो पक्षप्रमुख.. खरच मर्द असाल.. तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखला आपली शिवसेना आता "सेक्युलर"आहे.. नाहीतर "हो मी नामर्द आहे” असं तरी ?'', असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना  डिवचले आहे.

भाजपाच्या टीकेनंतर पाडुरंग सकपाळ यांनी केला खुलासा -अजानच्या मुद्यावर राजकीय वातावरण तापल्यानंतर पांडुरंग सकपाळ यांनी खुलासा केला आहे. पांडुरंग सकपाळ म्हणाले, मुंबादेवी विधानसभेतील फाउंडेशन फॉर युथ' नावाच्या संस्थेच्या सदस्यांनी अजानची खुली स्पर्धा आयोजित केली होती. मी त्यांना कोरोनाविषयक नियम अवगत करून दिले. खुली स्पर्धा केल्यास नियमांची पायमल्ली होईल हे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने कराव्यात असे सूचवले. अशा शुभेच्छा देताना माझ्या मनात धार्मिक किंवा राजकीय हेतू नव्हता. त्यामुळे या गोष्टींचे राजकारण करण्यात येऊ नये."

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा