शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देवेंद्र फडणवीसांनी जखमी मराठा आंदोलकांची मागितली माफी, पवारांच्या आरोपांना दिलं असं उत्तर...   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 15:29 IST

Devendra Fadnavis: जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आंदोलनात जखमी झालेल्या मराठा आंदोलकांची सरकारच्यावतीने क्षमा मागितली आहे.

जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलकांवर बेछूट लाठीमार झाल्याने राज्यात संतापाचं वातावरण आहे. या लाठीमाराला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आंदोलनात जखमी झालेल्या मराठा आंदोलकांची सरकारच्यावतीने क्षमा मागितली आहे. तसेच या प्रकरणाचे आदेश मुंबईतून, मंत्रालयातून आले अशी शंका व्यक्त करत फडणवीसांकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या शरद पवार यांनाही फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहेत.

याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. मराठा आरक्षणासंदर्भात जे प्रश्न  निर्माण झाले आहेत. त्याबाबत इथे चर्चा झाली. जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे उपोषण सुरू आहे त्यातील मागण्यांसंदर्भातही इथे सखोल चर्चा झाली. जालन्यामध्ये उपोषण सुरू आहे. तिथे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला गेला. खरं म्हणजे ही दुर्दैवी घटना आहे. तसेच अशा प्रकारच्या बळाच्या वापराचे समर्थन केलं जाऊ शकत नाही. 

मी आधीही पाच वर्षे गृहमंत्री होतो. त्या काळात आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारची दोन हजार आंदोलनं झाली. परंतु कधीही आम्ही बळाचा वापर केलेला नाही. तसेच आताही बळाचा वापर करण्याचं कारण नव्हतं. त्यामुळे ज्या निष्पाप नागरिकांना बळाच्या वापरामुळे इजा झाली आहे. जे जखमी झाले आहेत त्यांच्याप्रति मी शासनाच्या वतीने क्षमायाचना करतो. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच या संदर्भातील दोषींवर कारवाई करण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

मात्र या घटनेचं राजकारण व्हावं हे देखील योग्य नाही. काही पक्षांनी, काही नेत्यांनी तोही प्रयत्न केला हे दुर्दैवी आहे. विशेषत: जाणीवपूर्वक लाठीमाराचे आदेश मंत्रालयातून आले. वरून आले. अशा प्रकारचे नरेटिव्ह तयार करण्याच प्रयत्न झाला. लाठीमार करण्याचे आदेश देण्याचा अधिकार एसपी आणि डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना असतात. त्यासाठी कुणाच्या आदेशांची गरज नसते, हे या नेत्यांनाही माहिती आहे. मग माझा सवाल आहे की, ज्यावेळी निष्पाप ११३ गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले तेव्हा तसा आदेश कुणी दिली होता. तो मंत्रालयातून आला होता. मावळमध्ये शेतकरी मृत्युमुखी पडले तेव्हा ते आदेश कुणी दिले. तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते का, तेव्हा त्यांनी राजीनामा का दिला नाही. त्यामुळे मुळातच घटना चुकीचीच आहे. मात्र त्याचं राजकारण करून सरकार हे करतंय, असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र लोकांनाही हे राजकारण सुरू आहे, हे कळतंय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.    

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार