मुंबई : नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचत असताना आता नेते वेगवेगळे फंडे वापरत आहेत. सभांचा धडका लावूनदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळीकडे पोहोचू शकत नसल्याने ते फोनवरून सभांना संबोधित करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभांमधूनच संबंधित मंत्र्यांना फोन करून विकासाची हमी देत आहेत. सत्तारूढ भाजप व शिंदेसेना यांच्यातील राडा कोकणात सुरूच आहे. शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला. त्यावरून कलगीतुरा रंगला आहे.
शिंदेसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या विधानावरून भाजपचे मंत्री व राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्यात वाद रंगला आहे. नारायण राणे यांचे महत्त्व कमी करण्याचा कट रचला जात आहे, असा आरोप केसरकर यांनी केला, त्यावर राणेसाहेबांची बदनामी आधी कोणी केली, असा प्रतिसवाल नितेश यांनी केला. नीलेश यांना त्यांच्याच पक्षात एकटे पाडले जात आहे, असे नितेश राणे म्हणाले. त्यावर आम्ही नीलेश यांच्या पाठीशी असल्याचे केसरकर म्हणाले.
उपमुख्यमंत्र्यांचा फोन फंडा
उदगीरच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना भाषण सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाइलवरून सूचना केली.
अहिल्यानगर जिल्ह्यात शेवगावच्या सभेतही त्यांनी मंत्री उदय सामंत व गुलाबराव पाटील यांना फोनवरून सूचना देत शेवगावचा पाणीप्रश्न व एमआयडीसी मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रचार 3 सभेत शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली. फोनवरून उद्या ते नदीदेखील देऊन टाकतील. यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे भावनिक आवाहन
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीत विकासाचा लेखाजोखा मांडला. शहरासाठी १३० कोटींच्या पाणीपुरवठा योजना तसेच अतिक्रमणे नियमित करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. २ डिसेंबरला माझी चिंता करा, पाच वर्षे मी तुमची चिंता करेल, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
एका सभेहून दुसऱ्या सभेला जाताना प्रवासात फोनवरून घेतली तिसरी सभा
मुख्यमंत्री फडणवीस हे एक सभा आटोपून दुसऱ्या सभेला जात असताना गाडीमधूनच तिसऱ्या सभेला मोबाइलवरून संबोधित करत आहेत. महाड, जत आदी ठिकाणी त्यांनी मोबाइलवरून सभा घेतल्या आणि विकासाची ग्वाही दिली.
Web Summary : As council elections approach, leaders are using innovative tactics like phone addresses. Political clashes continue in Konkan between BJP and Shinde Sena. Chief Minister and Deputy Chief Minister assure development projects via phone during rallies.
Web Summary : नगर परिषद चुनाव नजदीक आते ही नेता फोन पर संबोधन जैसे नए तरीके अपना रहे हैं। भाजपा और शिंदे सेना के बीच कोंकण में राजनीतिक टकराव जारी है। मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री रैलियों के दौरान फोन से विकास परियोजनाओं का आश्वासन दे रहे हैं।