“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 11:47 IST2026-04-04T11:45:41+5:302026-04-04T11:47:21+5:30

Deputy CM Sunetra Ajit Pawar News: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुती आग्रही असून, काँग्रेस मात्र लढण्यावर ठाम असल्याचे म्हटले जात आहे.

deputy cm sunetra pawar make phone call to uddhav thackeray for support in baramati bypoll election 2026 | “बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग

“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग

Deputy CM Sunetra Ajit Pawar News: बारामती आणि राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुती प्रयत्नशील असली, तरीही महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धवसेना विरोधात उमेदवार देण्याचा विचार करत आहेत. काँग्रेसने तर उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. यातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा देण्याचे आवाहन केल्याचे वृत्त आहे. 

काँग्रेस पक्ष राहुरी आणि बारामती विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे, या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याच्या हालचाली ही काँग्रेसने सुरू केल्या आहेत.  बारामती विधानसभेची जागा रिक्त झाल्यानंतर आता येथे पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने कुठलीही घुसखोरी केलेली नाही. आम्ही या निवडणुकीकडे लोकशाहीच्या दृष्टीने पाहत आहोत. निवडणुकीत लोकशाही टिकली पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे, असे जगताप म्हणाले. 

सुनेत्रा अजित पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केल्याचे समजते. सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेस पक्ष बारामती निवडणूक लढण्यावर ठाम असले तरी, काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा मिळण्यासाठीही सुनेत्रा पवार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राहुरी आणि बारामतीसाठी २३ एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे. बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उमेदवार न देण्याची भूमिका जाहीर केली आहे. 

 

Web Title : बारामती उपचुनाव में सुनेत्रा पवार ने उद्धव ठाकरे से समर्थन मांगा।

Web Summary : सुनेत्रा पवार ने बारामती उपचुनाव में उद्धव ठाकरे से समर्थन की अपील की। कांग्रेस चुनाव लड़ने को उत्सुक है। चुनाव को निर्विरोध बनाने के प्रयास जारी हैं, जबकि एनसीपी ने पवार का समर्थन किया।

Web Title : Sunetra Pawar calls Uddhav Thackeray seeking support in Baramati by-election.

Web Summary : Sunetra Pawar appealed to Uddhav Thackeray for support in the Baramati by-election. Congress is keen to contest. Efforts are underway to make the election unopposed, while NCP supports Pawar.