शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

“जिवाभावाचा माणूस…”; सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट, अजितदादांचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 17:38 IST

Sunetra Ajit Pawar Social Media Post: अजितदादांच्या निधनाला एक महिना झाला असून, सुनेत्रा पवारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यासोबत १० मिनिटांचा अजितदादांचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

Sunetra Ajit Pawar Social Media Post: जिवाभावाचा माणूस… काही माणसं पदाने मोठी असतात… काही कामाने मोठी असतात… पण अजितदादा मनाने मोठे होते, म्हणूनच ते आपले होते. माणुसकीची खोल जाण त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवायची. कामाबद्दलची त्यांची अखंड प्रामाणिक तळमळ ही केवळ जबाबदारी नव्हती, ती त्यांची जीवनशैली होती. समाजासाठी झटणं हे त्यांच्यासाठी कर्तव्य नव्हतं… ती त्यांची श्रद्धा होती, असे म्हणत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांबद्दल अत्यंत हळवी पोस्ट शेअर केली आहे. यासोबत अजित पवार यांचा एक १० मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला एक महिना पूर्ण झाला. अद्यापही संपूर्ण महाराष्ट्र अजित पवार यांच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त करताना दिसत आहे. या महिन्याभरात अनेक घडामोडी घडल्या. रोहित पवारांनी या विमान अपघातावर शंका व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद, पालकमंत्रीपद आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत राजकारणात सक्रीय सहभागी झाल्या आहेत. यातच अजित पवार यांच्या जाण्याच्या धक्क्यातून अजूनही सुनेत्रा पवार सावरल्याचे पाहायला मिळत आहे. 

ते फक्त नेता नव्हते… ते आधारवड होते!

एक्सवर एक पोस्ट करत सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या आठवणी जागवल्या आहेत. जनहितासाठी सत्ता वापरण्याची त्यांची ठाम भूमिका, दूरदृष्टीतून आखलेले विकासाचे मार्ग आणि कामातून कमावलेला जनतेचा अपार विश्वास, हेच त्यांच्या आयुष्याचं खरं सार होतं. स्वभावाने दिलदार… आपुलकीने माणसं जोडणारे… आणि निर्णयाच्या वेळी तितकेच रोखठोक, ठाम आणि विकासाभिमुख नेतृत्व, ही त्यांची वेगळीच ओळख होती. ते फक्त नेता नव्हते… ते आधारवड होते! प्रत्येक समाजघटकाला साथ देत, प्रत्येक अडचणीत खंबीर उभं राहत, “विकासाचे राजकारण” त्यांनी केवळ बोलून नाही, तर कृतीतून जगून दाखवलं. आज त्यांच्या उणीवेची वेदना मनाला खोलवर बोचते… कारण हरवलं आहे ते फक्त नेतृत्व नाही, हरपलाय एक जिवाभावाचा माणूस.

प्रत्येक कामात त्यांचं प्रतिबिंब कायम दिसत राहील

पण त्यांच्या आठवणी दुःख देत नाहीत, त्या प्रेरणा देतात. त्यांची कार्यतत्परता, त्यांची जिद्द आणि राष्ट्रवादी परिवाराला दिलेलं बळ, हेच आपल्याला पुढे चालत राहण्याची नवी उर्जा देत राहील. अजितदादा शारीरिकरित्या आपल्यात नसले तरी… त्यांचे विचार आपल्या ध्येयात जिवंत आहेत. त्यांचे संस्कार आपल्या कृतीत जिवंत आहेत आणि त्यांच्या स्वप्नांचा वारसा आपल्या प्रत्येक पावलात जिवंत आहे. अजितदादा सदैव आपल्या स्मरणात…आपल्या विचारांत… आपल्या कृतीत… आणि आपल्या प्रत्येक कामात त्यांचं प्रतिबिंब कायम दिसत राहील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar's emotional post: Remembering Ajit Pawar's heartfelt legacy.

Web Summary : Sunetra Pawar shared a touching tribute to Ajit Pawar, highlighting his humanity and dedication. She emphasized his role as a leader and a support system, noting the void his absence creates. His commitment to development and public service continues to inspire.
टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीPlane Crashविमान दुर्घटना