Deputy CM Eknath Shinde News: धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत आहे. दिवा बत्ती, रस्ते पाहिजे असतील तर परिवर्तन आवश्यक आहे. जनतेचा पैसा वाया जात कामा नये. लोकाभिमुख कामे झाली पाहिजेत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही. एकनाथ शिंदे कधी झोपतो, कधी उठतो हा प्रश्न विरोधकांना पडत असतो. मी नेहमी इतरांच्या झोपा मोडत असतो, अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे विविध ठिकाणी भेटी देत आहेत. नगरविकास विभागाच्या माध्यमातून विकास होणार आहे. जबरदस्तीने विकास होणार नाही. आदिवासी समाजाच्या बांधवांच्या वस्ती कायम करून त्यांना हक्काचे घर देऊ, जुने वाडे हेरिटेज आहेत, त्यासाठी नियोजन करू. नगरविकास खात्याच्या माध्यमातून जे जे शक्य आहे ते करू, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.
महिलांना सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली
लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत जो करिष्मा करून दाखवला तोच आता पुन्हा एकदा करून दाखवावा. राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी आपण लाडकी बहीण योजना सुरू केली. लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली. आता तर फक्त १५०० रुपये देऊन थांबणार नसून, नगरविकास विभागाच्या माध्यमातून खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू-संतांची मोठी उपस्थिती असेल आणि त्यांच्या समाधी, निवास व्यवस्थेसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासन पार पाडेल. साधूसंत, वारकरी तसेच इथल्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान राखूनच विकास करण्यात येईल आणि कुणालाही जोर जबरदस्तीने बेघर केले जाणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Eknath Shinde emphasizes development, women's empowerment, and Kumbh Mela preparations. He highlighted government schemes providing financial assistance and facilities. Assured respect for heritage and no forced displacement.
Web Summary : एकनाथ शिंदे ने विकास, महिला सशक्तिकरण और कुंभ मेला की तैयारियों पर जोर दिया। उन्होंने वित्तीय सहायता और सुविधाएं प्रदान करने वाली सरकारी योजनाओं पर प्रकाश डाला। विरासत के सम्मान और जबरन विस्थापन न करने का आश्वासन दिया।