नगरपरिषद निवडणुकांसाठी DCM एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनतेचा प्रचंड प्रतिसाद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 22:09 IST2025-12-01T22:07:12+5:302025-12-01T22:09:53+5:30
Deputy CM Eknath Shinde News: महाराष्ट्रातील जवळपास सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला.

नगरपरिषद निवडणुकांसाठी DCM एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनतेचा प्रचंड प्रतिसाद!
Deputy CM Eknath Shinde News: महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर तब्बल ५३ सभा आणि रोड शो घेत थेट जनतेशी संवाद साधला. २२ नोव्हेंबर २०२५ ते ०१ डिसेंबर २०२५ या अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत त्यांनी महाराष्ट्रातील जवळपास सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्ये भव्य प्रमाणात प्रचार केला.
या प्रचार मोहिमेत प्रचंड उत्साह, घोषणांचा आवाज आणि अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी सभास्थळी जागा अपुरी पडली. लोकांनी सभास्थळाबाहेरूनच भाषणांचा आनंद घेतला. जनतेतून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे राज्यात शिवसेनेची लाट उसळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
जनतेचे प्रेम हेच माझे बळ
सभांमधून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जनतेशी थेट संवाद साधला. अनेक ठिकाणी स्थानिक मागण्या, विकासकामे, शेतकरी प्रश्न, तरुणांसाठी रोजगार, पायाभूत सुविधा आणि शासनाच्या निर्णयांची माहिती त्यांनी जनतेसमोर मांडली. जनतेचा विश्वास, आणि शिवसेनेचा विकासमार्ग, याच मार्गाने महाराष्ट्र पुढे जाणार, असे एकनाथ शिंदे यांनी विविध सभांमध्ये सांगितले. जनता म्हणते की, काम करणारा नेता हवा आणि एकनाथ शिंदे ते करतात. सभास्थळी उपस्थित नागरिकांचे एकमत झाल्याचे दिसून आले. शब्द देतो आणि पूर्ण करतो असा नेता हवा. शिंदे त्याचेच उदाहरण आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा झंझावाती दौरा निवडणूक प्रचाराला नवीन दिशा देणारा आणि राज्याच्या राजकीय समीकरणात बदल घडविणारा ठरेल, अशी चर्चा राज्यभर रंगली आहे. आगामी निवडणुकांमध्ये या दौऱ्याचा परिणाम निश्चित दिसून येईल, असेही मत व्यक्त केले जात आहे.