पीक कर्जमाफी होणार की नाही? DCM अजित पवारांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “...तर निर्णय घेऊ”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:48 IST2025-03-28T14:47:23+5:302025-03-28T14:48:08+5:30

Deputy CM Ajit Pawar News: शेतकरी कर्जमाफी मुद्द्यांवरून विरोधक सातत्याने महायुती सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत.

deputy cm ajit pawar clearly spoke about will there be a crop loan waiver or not | पीक कर्जमाफी होणार की नाही? DCM अजित पवारांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “...तर निर्णय घेऊ”

पीक कर्जमाफी होणार की नाही? DCM अजित पवारांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “...तर निर्णय घेऊ”

Deputy CM Ajit Pawar News: विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या. आर्थिक शिस्त गरजेची असते. त्याप्रमाणे अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी टीका करायची ती केली. आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही, याचा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला.

बारामतीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार यांनी अनेक मुद्द्यांवर आपल्या खास शैलीत थेट शब्दांत भाष्य केले. राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत शेती पीकासाठी कर्ज दिले जाते. यात सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते. सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिले होते. पुन्हा सत्तेत आलेले महायुती सरकार कर्जमाफी करेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी यावर भाष्य केले.

पीक कर्जमाफी होणार की नाही? DCM अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते. राज्यातील जनतेला सांगतो की, ३१ तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितले होते, ते प्रत्यक्षात सध्या तरी येताना दिसत नाही. आता तशी परिस्थिती नाही, भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. आत्ता आपली परिस्थिती नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, बारामती तालुक्यातील माळेगांव सहकारी साखर कारखाना परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नूतनीकरण करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. 

 

Web Title: deputy cm ajit pawar clearly spoke about will there be a crop loan waiver or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.