'उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत'; शेतकऱ्यांच्या मदतीवरुन एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 17:41 IST2025-10-11T17:18:28+5:302025-10-11T17:41:35+5:30

शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली

Deputy Chief Minister Eknath Shinde criticized Uddhav Thackeray Uddhav Thackeray Hambarda Morcha for farmers | 'उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत'; शेतकऱ्यांच्या मदतीवरुन एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

'उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत'; शेतकऱ्यांच्या मदतीवरुन एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Eknath Shinde On Uddhav Thackeray Morcha: मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी हंबरडा मोर्चा काढला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान, महायुती सरकार आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री पद काढून घेण्याची मागणी केली. या हंबरडा मोर्चावरुन आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या मुलांच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांच्या हातावर एक बिस्किटाचा पुडा तरी ठेवला का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी केली.

"महायुती सरकार हे शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रु पुसण्याचे काम महायुती सरकारने केले याचे समाधान मला आहे. आम्ही ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. आम्ही म्हणालो होतो की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. त्याप्रमाणे दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाऊ लागले आहेत. शेती वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठी चिंता होती. त्यामुळे आम्ही ४७ हजार रुपये हेक्टरी देण्याचे ठरवले आहे. शेतकऱ्यांची चिंता आम्ही मिटवली आहे," असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

"हे निव्वळ राजकारण आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना त्यांच्या हातात काही दिलं का? शेतकऱ्यांच्या मुलांच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्याच्या हातावर एक बिस्किटाचा पुडा तरी ठेवला का?आम्ही त्यांच्यासाठी किट पाठवले, त्यांचा दसरा चांगला झाला. त्यांनी हंबरडा मोर्चा काढला. हंबरला कसला?  उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागले आहेत. सत्ता गेली, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला. हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. हे शेतकऱ्यांच्या नावावर केलेले राजकारण आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना कुणीही राजकारण करु नये. अशा वेळी त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे," असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

"मी मुख्यमंत्री असताना सुद्धा उद्धव ठाकरे टीका करत होते. मला घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणत होते. निवडणूक आयोगाला शिव्या देत होते. आता आपण त्यांच्या आरोपांना कामातून उत्तर देणार आहोत. आपल्याला केवळ एकच ब्रँड माहिती आहे. तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हबंरडा फोडताना डोळ्यात आसू असतात, चेहऱ्यावर रडू असते. परंतु ते तर हसत होते," अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.

Web Title : शिंदे ने ठाकरे के किसान सहायता प्रदर्शन को 'रोना' बताया, आलोचना की।

Web Summary : एकनाथ शिंदे ने उद्धव ठाकरे के किसानों के विरोध पर कटाक्ष करते हुए उनके पुराने कार्यों पर सवाल उठाए। शिंदे ने सरकार के राहत पैकेज और किसानों का समर्थन करने की प्रतिबद्धता पर प्रकाश डाला, और ठाकरे पर राजनीतिक अवसरवाद का आरोप लगाया।

Web Title : Shinde slams Thackeray's 'crying' protest over farmer aid in Maharashtra.

Web Summary : Eknath Shinde criticized Uddhav Thackeray's protest for farmers, questioning his past actions. Shinde highlighted the government's relief package and commitment to supporting farmers, accusing Thackeray of political opportunism and shedding crocodile tears.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.