सारथीचा कारभार आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 06:33 IST2020-09-18T01:43:54+5:302020-09-18T06:33:46+5:30
बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हे संस्थेवर अन्याय करीत असल्याच्या आरोपानंतर ते व्यथित झाले होते.

सारथीचा कारभार आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हाती
मुंबई : मराठा समाजाच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेचा कारभार आता बहुजन कल्याण विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे सोपविण्यात आला आहे.
बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हे संस्थेवर अन्याय करीत असल्याच्या आरोपानंतर ते व्यथित झाले होते. त्यानंतर बैठकीत सारथीचा कारभार नियोजन विभागाकडे देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आदेश निघाला.
तशी भरती शक्य - अॅड. अणे
१३ टक्के पदे न भरता अन्य पोलीस शिपाई भरती करण्यात कुठलीही कायदेशीर अडचण नाही. सरकारला तो अधिकार आहे. मराठा आरक्षणाचा राज्यात कायदा आहे, पण त्याला अंतरिम स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे भरती करता येईल, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले.
नेतृत्व कोणी करायचे?
मराठा आरक्षणप्रकरणी नेतृत्व कोणी करायचे, खा. छत्रपती संभाजीराजे यांनी की खा. छत्रपती उदयनराजे, यावरून मतभिन्नता आहे. माझ्या दृष्टीने आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली.