शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची नागरिकांप्रति उदासीनता

By admin | Updated: September 6, 2016 00:52 IST

महापालिकेच्या प्रबोधनात्मक व माहितीपर उपक्रमाच्या जाहिरातींसाठी देण्याचा नियम उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आला

दीपक जाधव,

पुणे- गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांकडून कमानींवर केल्या जाणाऱ्या एकूण व्यावसायिक जाहिरातींच्या एकपंचमांश (१/५) जागा महापालिकेच्या प्रबोधनात्मक व माहितीपर उपक्रमाच्या जाहिरातींसाठी देण्याचा नियम उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आला आहे. मात्र, या नियमाचे पालन करण्याबाबत महापालिका प्रशासनच उदासीन असल्याने लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याच्या सोप्या मार्गाकडे दुर्लक्ष होत आहे. मिळकत कराची अभय योजना सुरू केलीय; मात्र अजून बहुतांश लोकांपर्यंत ती न पोहोचल्याने प्रतिसाद कमी आहे. मीटरने पाणी योजना काय आहे, समलेलेच नाही. अशा अनेक समस्यांना पालिकेला तोंड द्यावे लागत आहे. गणेशोत्सवामध्ये लाखो पुणेकर आवर्जून बाहेर पडतात. त्यामुळे गणेश मंडळांच्या कमानींवर जाहिरात लावण्यासाठी व्यावसायिक कंपन्या प्रचंड खर्च करीत असतात. महापालिकेला मोठ्या प्रमाणात जागा जाहिरातींसाठी मोफत उपलब्ध होत असताना त्याचा विनियोग करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.शहरात साधारणत ६ हजार गणेश मंडळे आहेत. त्यांपैकी १,८०० गणेश मंडळे मोठी आहेत. त्यातील अनेक मंडळांकडून जाहिरातींच्या कमानी लावल्या जातात. त्याच्या प्रायोजकत्वातून गणेश मंडळांना कोट्यवधी रुपये मिळतात. कंपन्यांच्या प्रायोजकत्वातून मिळणाऱ्या निधीमुळे अनेक मंडळांना आता लोकांकडून वर्गणी गोळा करण्याचीही आवश्यकता उरलेली नाही. या प्रत्येक मंडळांच्या कमानीची एकपंचमांश जागेचा विचार केल्यास महापालिकेला मोफत उपलब्ध होणारी कोट्यवधी रुपयांची जागेवर जाहिरात करण्याकडे पालिकेच्या उदासीनमुळे पाणी फेरले जात आहे.>टोल फ्री क्रमांकाची माहितीच नाही : उपायांवर पडले पाणीकचराकुंडी भरून वाहते आहे, रस्त्यांवर खड्ड पडलेयत, पाणी आले नाही, ड्रेनेज तुंबलेय, टॅक्स कुठे भरायचा, मिळकत कराच्या अभय योजनेत कसे सहभागी व्हायचे यासह महापालिकेशी संबंधित सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महापालिकेने १८००१०३०२२२ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. केवळ एका फोनवर नागरिकांच्या तक्रारी नोंदवून त्याची सोडवणूक केली जात आहे. मात्र, या टोल फ्री क्रमांकाची पुरेशी माहिती लोकांपर्यंत पालिकेला पोहोचलेली नाही. गणेशोत्सवामध्ये हा क्रमांक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची संधी महापालिकेकडे गणेशोत्सवानिमित्त आहे.>नियम बनविला; पण अंमलबजावणीचे सांगितलेच नाहीगणेश मंडळांच्या कमानीवरील एकपंचमांश जागेवर पालिकेची जाहिरात करण्याची जबाबदारी गणेश मंडळांवर टाकण्यात आलेली आहे. मात्र, गणेश मंडळांनी पालिकेच्या कोणत्या जाहिराती कराव्यात, याविषयी त्यांना प्रशासनाकडून काहीच सांगण्यात आलेले नाही. गणशोत्सवापूर्वी महिनाभर अगोदार महापालिकेकडून शहरातील सर्व गणेश मंडळांची बैठक घेतली जाते, त्या वेळी ही माहिती त्यांना देणे अपेक्षित होते. त्यामुळे एका चांगल्या उपक्रमाची अंमलबजावणी रखडली आहे.गणेश मंडळांना व्यावसायिक जाहिराती लावायच्या असल्यास मंडळापासून ५० मीटर अंतरापर्यंत कमानी लावता येतात. यासाठी पालिकेकडे त्यांना ५०० रुपये शुल्क भरावे लागते. या सर्व जाहिरातीमधील एकपंचमांश जागेवर महापालिकेच्या उपक्रमाची जाहिरात करणे बंधनकारक आहे. जर एकापेक्षा जास्त मंडळे ५० मीटरच्या आत येत असतील, तर त्या मंडळांना समप्रमाणात विभागून जाहिराती लावण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, कोणत्याही मंडळाला मंडपापासून ५० मीटरपेक्षा जास्तीच्या जागेवर रनिंग मंडप टाकून जाहिराती लावता येणार नाहीत. जाहिरातींबाबत काही तक्रारी आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मंडळावर असणार आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाची परवानगी घेऊन या जाहिराती मंडळांना करता येणार आहेत आदी नियम महापालिकेच्या मंडप धोरणामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. मात्र, याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.