शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
2
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
3
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
4
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
6
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
7
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
8
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
9
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
10
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
11
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
12
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
13
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
15
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
16
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
17
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
18
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
19
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
20
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:27 IST

ST Bus Minister Pratap Sarnaik News: कोणत्याही प्रकारची हलगर्जी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

ST Bus Minister Pratap Sarnaik News: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला पुन्हा एकदा भेट दिली. या भेटीदरम्यान  शौचालय,  पाणपोई सारख्या सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या प्रकरणी सोलापूर आगाराचे 'आगार व्यवस्थापक' यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

मध्यवर्ती बसस्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता, तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. शौचालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून  शौचालयाची डागडुजी करण्यात आली नव्हती. अनेक ठिकाणी फरशा उखडल्या होत्या. तसेच स्वच्छता ठेवण्यात आली नव्हती. जवळच असलेल्या पाणपोई परिसरात अत्यंत अस्वच्छता असल्याचे आढळून आले. पाणपोईच्या ५ नळांपैकी केवळ एकच नळ सुरू होता. या बाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना तात्काळ दिले. 

विशेष म्हणजे मागील आठवड्यात उपरोक्त त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे  निर्देश आपल्या आकस्मिक पाहणी दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी संबंधितांना  दिले होते. याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळी पुनश्च: तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर प्रवासी सुविधा मध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम भरला होता. 

सोलापूर बस स्थानकावरील या गैरसोयीबद्दल कोणताही बदल स्थानिक प्रशासनाकडून करण्यात न आल्यामुळे नाईलाजाने संबंधित आगार व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्र्यांना द्यावे लागले आहेत. राज्यातील एसटीच्या २५१ आगार प्रमुखांनी या घटनेकडे अत्यंत गंभीरपणे पहावे आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये विशेषत: बसस्थानकावरील महिला प्रसाधनगृहाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Bus Depot Manager Suspended Over Uncleanliness; Sarnaik Orders

Web Summary : Transport Minister Pratap Sarnaik suspended the Solapur depot manager due to unacceptable neglect of basic passenger amenities like toilets and drinking water. Despite prior warnings to improve facilities, the bus station remained unsanitary, leading to immediate action. Sarnaik warned other depot managers against negligence.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकstate transportएसटीSolapurसोलापूर