संत तुकाराम, संत एकनाथ पालखीचे आज प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 06:51 IST2023-06-10T06:51:04+5:302023-06-10T06:51:38+5:30

देहू-आळंदीत हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. 

departure of sant tukaram and sant eknath palkhi today for ashadhi ekadashi wari | संत तुकाराम, संत एकनाथ पालखीचे आज प्रस्थान

संत तुकाराम, संत एकनाथ पालखीचे आज प्रस्थान

राजेंद्र काळोखे/भानुदास पऱ्हाड,  लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीक्षेत्र देहूगाव/आळंदी : देहू-आळंदीत राज्याच्या कोनाकोपऱ्यातून दिंड्या दाखल झाल्या आहेत. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी दुपारी दोन वाजता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्याचवेळी पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर)  येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचेही प्रस्थान होणार आहे. रविवारी होणाऱ्या माउलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी अलंकापुरी अर्थात आळंदीनगरी सजली आहे. देहू-आळंदीत हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. 

पालखी प्रस्थान सोहळ्यास पहाटे ५ वाजता सुरुवात होईल. सायंकाळी ५ वाजता पालखी मुख्य मंदिर प्रदक्षिणेसाठी भजनी मंडपातून बाहेर पडेल. त्यानंतर सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्यात जाईल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवारी सायंकाळी चार वाजता तीर्थक्षेत्र आळंदीतून प्रस्थान ठेवणार आहे.

 

Web Title: departure of sant tukaram and sant eknath palkhi today for ashadhi ekadashi wari