Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 20:19 IST2025-07-31T20:14:32+5:302025-07-31T20:19:47+5:30
Dengue outbreak in Nashik: नाशिकमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून गेल्या महिन्याभरात रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे.

Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
नाशिककरांच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली. शहरात डेग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याचे पाहायला मिळाले. आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरात डेंग्यू रुग्णांची संख्या तिप्पट वाढली असून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नाशिक शहरात जून महिन्यात डेंग्यू रुग्णांची संख्या २५ होती. मात्र, २९ जुलैपर्यंत एकूण ७५ रुग्ण डेंग्यूने संक्रमित झाले आहेत. सततच्या पावसामुळे डेंग्यूच्या संसर्गात वाढ झाली आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. नाशिक रोडमध्ये २३ रुग्णांची नोंद झाली आहे, जे शहरातील सर्वाधिक आहे. तर, सातपूरमध्ये १४ रुग्ण आहेत, अशी माहिती मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत कोशिरे यांनी दिली.
नाशिकमध्ये मे महिन्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचल्याने डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डेंग्यू पसरवण्यासाठी जबाबदार असलेला एडिस इजिप्ती डास केवळ स्वच्छ साचलेल्या पाण्यातच प्रजनन करतो, असे म्हणतात. नाराळाचे कवट्या, टायर आणि कुंड्या यांसारख्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचते, जे डेंग्यू डासांसाठी मुख्य प्रजनन ठिकाणे मानली जातात.
विभागनिहाय डेंग्यू प्रकरणांची संख्या:
विभाग | रुग्णसंख्या |
नाशिक रोड | २३ |
सातपूर | १४ |
सिडको | १२ |
नाशिक पूर्व | ११ |
नाशिक पश्चिम | ०८ |
पंचवटी | ०७ |