शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

दलित विद्यार्थी संघटनेवरील बंदीविरोधात निदर्शने

By admin | Updated: June 2, 2015 01:57 IST

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी मद्रासने (आयआयटी-एम) बहुतांश दलित विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या एका संघटनेची मान्यता काढून घेतल्यानंतर

नवी दिल्ली/चेन्नई : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी मद्रासने (आयआयटी-एम) बहुतांश दलित विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या एका संघटनेची मान्यता काढून घेतल्यानंतर या विरोधातील निदर्शने सुरूच आहेत. आता या वादात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (रालोआ) मित्र पक्ष आरपीआय, अर्थात रिपब्लिकन पक्षानेही (आठवले गट) उडी घेतली आहे. विद्यार्थी संघटनेवरील कारवाई अयोग्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचे आरपीआयने म्हटले.कथितरीत्या केवळ पंतप्रधान मोदी यांची विरोधक असल्यामुळे आंबेडकर पेरियार अभ्यास मंडळ (एपीएससी) या विद्यार्थी संघटनेवर बंदी घालण्यात आल्याचा आरोप आहे. या निषेधार्थ सोमवारी चेन्नईत द्रमुक विद्यार्थी संघटनेच्या सुमारे २०० कार्यकर्त्यांनी याविरोधात निदर्शने केली. दिल्लीतील शास्त्री भवनाबाहेर डावेसमर्थित विद्यार्थी संघटनांनीही निषेध नोंदवला. याच ठिकाणी मनुष्यबळ विकास मंत्रालय आहे.आरपीआय नेते रामदास आठवले यांनी ही कारवाई अन्यायकारक असून मनुष्यबळविकासमंत्री स्मृती इराणींनी ती तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. या संघटनेने पंतप्रधानांवर हल्ला केला असला तरीही ही कारवाई अन्यायकारकच ठरते. यासाठी मान्यता रद्द करणे, हा उपाय असू शकत नाही, असे ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)