दीड दशकापासून रखडलेला कुर्ला सब-वे अखेर पूर्णत्वाला ! आता प्रतीक्षा उदघाटनाची

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 08:31 PM2017-10-04T20:31:01+5:302017-10-04T20:37:53+5:30

कुर्ल्यातील पूर्व आणि पश्चिम मार्गांना जोडणाºया कुर्ला सब-वेचे काम अखेर गेल्या दीड दशकाच्या प्रतिक्षेत पूर्ण झाले आहे.या मार्गासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आला आहे. आता तो प्रत्यक्ष नागरिकांसाठी केव्हा खुला केला जाणार, याकडे सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

Demonstrated VVPAT machine demonstration by Election Commission | दीड दशकापासून रखडलेला कुर्ला सब-वे अखेर पूर्णत्वाला ! आता प्रतीक्षा उदघाटनाची

दीड दशकापासून रखडलेला कुर्ला सब-वे अखेर पूर्णत्वाला ! आता प्रतीक्षा उदघाटनाची

Next

मुंबई  - कुर्ल्यातील पूर्व आणि पश्चिम मार्गांना जोडणाºया कुर्ला सब-वेचे काम अखेर गेल्या दीड दशकाच्या प्रतिक्षेत पूर्ण झाले आहे.या मार्गासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आला आहे. आता तो प्रत्यक्ष नागरिकांसाठी केव्हा खुला केला जाणार, याकडे सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.
सुमारे १२०.९० मीटर लांबीचा हा प्रकल्प मध्यरेल्वे व मुंबई महापालिकेच्या समन्वयातून करण्यात आले आहे.
मध्य रेल्वे व मुंबई महापालिकेच्या समन्वयाअभावी कुर्ला सब-वे चे काम २००२ पासून प्रलंबित राहिले होते. कुर्ला सबवेची एकूण लांबी १२९.९० मीटर, ७.६० रुंदी व उंची २.६० मीटर इतकी आहे. या प्रकल्पापैकी पश्चिमेकडील पोहोचमार्गाचे काम महापालिकेने पूर्ण केले होते. त्याचा एकुण खर्च २ कोटी ९४ लाख ८८ हजार ३८३ इतका झाला आहे. मे.जे.एल.कंस्ट्रक्शन कंपनीकडून हे काम करण्यात आले असून गेल्यावर्षी १५ फेब्रुवारी२०१६ रोजी सुरु झाले होते. पावसाळा वगळता त्यासाठी ९ महिन्याची मुदत होती. आतापर्यंत रेल्वेने ३ कोटी ८४ लाख ४३ हजार रुपये खर्च केले आहे. या काम पूर्र्ण करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली पाठपुरावा करीत होते. हा सब-वे सुरु झाल्यास हजारो पादचा-यांना फायदा होणार आहे. त्यामुळे तो त्वरित नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.

 

Web Title: Demonstrated VVPAT machine demonstration by Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.