शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाक बंदरमध्ये कामगारांचे धरणे

By admin | Updated: January 30, 2015 05:16 IST

प्रदूषणाच्या नावाखाली मुंबई बंदरातील ८० लाख टन मालाची वाहतूक सरकार इतर खासगी बंदरांकडे वळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत

मुंबई : प्रदूषणाच्या नावाखाली मुंबई बंदरातील ८० लाख टन मालाची वाहतूक सरकार इतर खासगी बंदरांकडे वळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत गोदी कामगारांनी कर्नाक बंदर येथे गुरुवारी तीव्र निदर्शने केली. वार्फ गेटच्या समोर धरणे आंदोलन करीत ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स युनियनने सरकारने मालवाहतुकीबाबत घेतलेला निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे.सरकारच्या निर्णयाचा फटका १२ हजार गोदी कामगारांसह ४० हजार निवृत्तिवेतनधारकांना बसेल, असा आरोप युनियनचे अध्यक्ष एस.आर. कुळकर्णी यांनी केला आहे. कुळकर्णी म्हणाले, बंदर बंद झाल्यास लाखो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असून, निवृत्तिवेतनधारकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. बंदरावर अनेक सोयी-सुविधांचा अभाव असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याऐवजी सरकार बंदरांची जागा हडप करण्याच्या विचारात आहे. त्यासाठीच बंदराच्या मोकळ्या जागेचा वापर बंदराच्या विकासासाठी करण्याऐवजी सरकार मनोरंजनाची साधने निर्माण करण्यासाठी करीत आहे. परिणामी, सरकारने नियुक्त केलेल्या सल्लागाराच्या निवडीबाबतही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)देशातील ४० टक्के माल वाहतुक ही खाजगी बंदरांतून होत असल्याचे युनियनने सांगितले. तर इतर वाहतुकही खाजगी बंदरांच्या घशात घालण्यासाठी सरकारने येथील वाहतुक दुसरीकडे हलवण्याचा डाव आखल्याचा आरोप युनियनने केला आहे. तरी राज्य व केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन युनियनने केले आहे. निर्णय मागे घेतला नाही, तर अखिल भारतीय गोदी व बंदर कामगार महासंघ आणि हिंद मजदूर सभेच्या सहकार्याने बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही युनियनने दिला आहे..........................