"लोकशाहीचे वस्त्रहरण, १७ ईव्हीएम मशिनचे सील तोडून पुन्हा मतदान पण अद्याप गुन्हा दाखल नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 14:55 IST2025-12-04T14:54:51+5:302025-12-04T14:55:54+5:30

मतचोरी, मतदार याद्यांमधील घोळ, यावर आवाज उठवत आहे पण त्यात काहीही सुधारणा होताना दिसत नाही. निवडणूक आयोगाने आतातरी डोळे उघडावे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

"Democracy is being stripped, 17 EVMs were broken and re-voting was conducted but no case has been registered yet" - Congress State president Harshvardhan Sapkal | "लोकशाहीचे वस्त्रहरण, १७ ईव्हीएम मशिनचे सील तोडून पुन्हा मतदान पण अद्याप गुन्हा दाखल नाही"

"लोकशाहीचे वस्त्रहरण, १७ ईव्हीएम मशिनचे सील तोडून पुन्हा मतदान पण अद्याप गुन्हा दाखल नाही"

मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगर पंचायतीचे मतदान संपल्यानंतर १७ ईव्हीएम मशिनचे सील तोडून पुन्हा मतदान केल्याचा धक्कादायक दावा विरोधकांनी केला आहे. मात्र यावर अद्याप एफआयआरही दाखल केलेला नाही. हे सर्व प्रकार लोकशाहीचे वस्त्रहरण करणारे आहे असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.  

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यात १० वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत परंतु या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्ष, प्रशासन व निवडणूक आयोग यांनी निवडणूक प्रक्रियेची थट्टा केली आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने निवडणूक प्रक्रिया सुधारण्यावर भर देत आहे. मतचोरी, मतदार याद्यांमधील घोळ, यावर आवाज उठवत आहे पण त्यात काहीही सुधारणा होताना दिसत नाही. निवडणूक आयोगाने आतातरी डोळे उघडावे. निवडणूक आयोगाला टी. एन. शेषन यांच्यासारख्या कणखर निवडणूक आयुक्ताची गरज आहे. येत्या १४ डिसेंबरला मतचोरीवरून दिल्लीत देशपातळीवर मोठी रॅलीही आयोजित केली आहे असं सपकाळ यांनी सांगितले. 

भाजपा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक

राज्यात मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाने धुमाकुळ घातला. शेतातील पिकं वाहून गेली, शेत जमीन खरडून गेली, सर्व हंगाम वाया गेला. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सरकारने ३३ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचे जाहीर केले पण ते कोणाला मिळाले हे माहित नाही. केंद्र सरकारकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्तावही पाठवला नाही. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी लोकसभेत महाराष्ट्र सरकारची लाज काढली. महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवलेला नाही हे केंद्रीय कृषिमंत्र्यांनीच सांगितले. यावरून भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती खोटे बोलतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारकडून राज्याला निधी आणला नाही व प्रस्तावही पाठवला नाही कारण भाजपा महायुती सरकारला शेतकऱ्यांना मदतच करायची नाही असं सपकाळ यांनी म्हटलं 

दरम्यान, राज्यातील भाजपा महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे.  मतचोरी करून सत्तेत आलेल्या सरकारची एका वर्षातच बौद्धिक व आर्थिक दिवाळखोरी निघाली आहे.  सत्तेत येताना लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार, नोकर भरती करणार अशी आश्वासने दिली होती पण त्याचा आता महायुती सरकारला विसर पडला आहे.  कोयता गँग, खोके, आका, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया हे महायुती सरकारने राज्याला दिले आहे. जाती धर्मात वाद निर्माण करण्याचे काम सरकारने केले असून ‘पैसा फेक तमाशा देख’, हे वग नाट्य जोरात सुरू आहे, असा टोलाही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. 

Web Title : लोकतंत्र नग्न: ईवीएम में हेराफेरी, पुनर्मतदान, एफआईआर दर्ज नहीं होने का आरोप

Web Summary : कांग्रेस ने सालेकसा नगर पंचायत चुनावों में ईवीएम में हेराफेरी का आरोप लगाया, कार्रवाई की मांग की। सपकाल ने किसान उपेक्षा, अधूरे वादों और सामाजिक विभाजन को बढ़ावा देने के लिए राज्य सरकार की आलोचना की, एक साल बाद इसे बौद्धिक और वित्तीय रूप से दिवालिया बताया।

Web Title : Democracy Undressed: Allegations of EVM Tampering, Re-polling, No FIR Filed.

Web Summary : Congress alleges EVM tampering in Salekasa Nagar Panchayat elections, demanding action. Sapkal criticizes the state government for farmer neglect, unmet promises, and fostering social divisions, labeling it intellectually and financially bankrupt after one year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.