सुडाच्या राजकारणात एपीएमसीची बदनामी
By Admin | Updated: December 23, 2014 02:31 IST2014-12-23T02:31:04+5:302014-12-23T02:31:04+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) चार वर्षांपासून सचिवपदाचा वाद सुरू आहे. संचालकांपासून अधिकाऱ्यांमध्ये एकमेकांवर सूड उगविण्याची स्पर्धा सुरू आहे.
सुडाच्या राजकारणात एपीएमसीची बदनामी
नामदेव मोरे, नवी मुंबई
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) चार वर्षांपासून सचिवपदाचा वाद सुरू आहे. संचालकांपासून अधिकाऱ्यांमध्ये एकमेकांवर सूड उगविण्याची स्पर्धा सुरू आहे.
२०१० मध्ये संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बिसलेरीचे पाणी दिले नाही म्हणून संचालकांनी तत्कालीन सचिव सुधीर तुंगार यांचा निषेध केला. बिसलेरी पाण्यासारख्या क्षुल्लक कारणासाठी सचिव बदलणारी ही पहिलीच संस्था ठरली. त्यांच्यानंतर शरद जरे यांची या पदावर वर्णी लावण्यात आली. परंतु त्यांचे तत्कालीन सभापती बाळासाहेब सोळसकर यांच्याशी मतभेद झाले आणि त्यांची ११ महिन्यांत बदली करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. सचिवपदावर अप्पर आयुक्त दर्जाचा अधिकारी असला पाहिजे असा ठराव करण्यात आला. जुलै २०११ पासून पुन्हा सुधीर तुंगार यांचीच या पदावर नियुक्ती करण्यात आली.
जरे यांना सहसचिव पदावर ठेवण्यात आले. एक वर्षापूर्वी शासनाने सचिवपदावर सुभाष माने यांची नियुक्ती केली. परंतु तुंगार यांनाही पद सोडण्याचे आदेश दिले नाहीत. माने यांची पणन संचालक पदावर नियुक्ती झाली. एफएसआय घोटाळ्याची चौकशी करण्याचे व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून या घोटाळ्याचा विषय गाजत आहे.