शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दंगलखोरांवर कडक कारवाई करणार - दीपक केसरकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 02:47 IST

कोरेगाव भीमा : ‘ज्यांनी दंगल घडविली ते कोणत्याही गटाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. निरपराध्यांचा यात बळी जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानाचा पोलीस व महसूल प्रशासनाकडून पंचनामा करुन योग्य ती मदत मिळवून दिली जाईल, असे अश्वासन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.केसरकर यांनी मंगळवारी ...

कोरेगाव भीमा : ‘ज्यांनी दंगल घडविली ते कोणत्याही गटाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. निरपराध्यांचा यात बळी जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानाचा पोलीस व महसूल प्रशासनाकडून पंचनामा करुन योग्य ती मदत मिळवून दिली जाईल, असे अश्वासन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.केसरकर यांनी मंगळवारी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार बाबूराव पाचर्णे, कायदा-सुव्यवस्थेचे महासंचालक बिपीन शर्मा, पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील आदी उपस्थित होते. या वेळी केसरकर यांनी पेरणे फाटा येथील विजय स्तंभ, वढु बुद्रुक येथील संभाजी महाराज समाधीस्थळ व गोविंद गोपाळ यांच्या स्मारकाची पाहणी केल्यानंतर कोरेगाव, सणसवाडी व शिक्रापूर यथील नुकसानाचीही धावती पाहणी केली.यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी पोलिसांनी कालची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली असून, बफर झोन तयार करून दोन गटांमधील अंतर कायम ठेवले. पोलिसांवरच दगडफेक होत असताना त्यांनी संयम ठेवून फक्त अश्रुधूर व लाठीचार्ज केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, असा दावा केला.पूर्वकल्पना असतानाही घटनास्थळी पोलीस बळ कमी पडले का? असा सवाल पत्रकारांनी केला असता, वढूतील झालेली घटना सामंजस्याने मिटविली होती. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होईल, असे वाटत नव्हते. काढण्यात आलेली रॅलीही पूर्वनियोजित नव्हती. दोन रॅली समोरासमोर आल्यावर घोषणाबाजी होऊन हा तणाव निर्माण झाल्याचे केसरकर यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याची गरज आहे, तर यापुढील काळामध्ये अशा प्रकरच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे.दंगलीमध्ये ठार झालेल्या राहुल बाबाजी फटांगडे (वय ३०, रा. साईनाथनगर डोंगरवस्ती, सणसवाडी) व इतर जखमींना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. इतर नुकसानाचा विमा नसला तरी मदत मिळवून देऊ, त्याचप्रमाणे यापुढे स्तंभ परिसरात येणाºया जनसमुदयाबाबत शासनाकडुून योग्य ती खबरदारी घेऊ असे त्यांनी सांगितले.पोलीस अकार्यक्षम असल्यानेच दुर्घटनाकोरेगाव भीमाची दुर्घटना दुर्दैवी असून पोलीस प्रशासन अकार्यक्षम राहिल्याने व परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळल्यानेच घटना घडल्याची टीका खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केली आहे. लोकसभेत उद्या कोरेगाव भीमा दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगून त्यांनी नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन या वेळी केले.तरीही कमी बंदोबस्तयावेळी बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले की,‘ वढु बुद्रुक येथे झालेली घटनेबाबात पोलीस यंत्रणेला एक महिन्यापूर्वीच कल्पना दिली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली नाही. पूर्वकल्पना असतानाही कोरेगाव भीमाला कमी पोलीस बंदांबस्त ठेवला. या घटनेत अनेकांचे उपजिविकेचे साधनच नष्ट झाले असल्याने प्रशासनाला योग्य पध्दतीने पंचनामे करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी आमदार अशोक पवार यांनीही योग्य ती खबरदारी न घेतल्याने व परिस्थिती हाताळताना लोकप्रतिनीधींना विश्वासात न घेतल्याने घटना घडली असल्याचे सांगितले.केसरकरांनी पाठ फिरवताच पुन्हा गोंधळकेसरकर येथून भेट देत शिक्रापूर कडे जाताच कोरेगाव भीमा येथे महामार्गावर जमा झालेल्या जमावाने काही दुकानांची जाळपोळ केल्याने गोंधळ निर्माण झाला.पोलिसांनी घेतली बघ्याची भुमिकापोलिसांसमोर जमाव स्थानीकांची वाहने, दुकाने जाळीत असतानाही पोलीस बघ्याची भुमिका घेत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तर पोलीसंनी कारण नसताना केवळ घरावर शिवरायांचा पुतळा असल्याने तोडफोड केल्याचीही तक्रार नागरिक करित होते.पंचनाम्यासाठी एसआयटी टीमकोरेगाव भीमा येथील नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी एसआयटी नेमली आहे. पंचनामे केले जातील व भरपाई मिळवून देण्यावर भर दिलाजाईल. घटनेवेळीचे सीसीटीव्ही फुटेजमिळविले असून, दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी दिले. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावDeepak Kesarkarदीपक केसरकर