केसरकर यांना इन्कम टॅक्सची नोटीस, बंडाशी संबंध नसल्याचं म्हणत दिला दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 20:31 IST2022-06-25T20:30:14+5:302022-06-25T20:31:49+5:30

दीपक केसरकर यांना आयकर विभागाची नोटीस आल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे.

deepak kesarkar shiv sena got income tax notice maharashtra political crisis eknath shinde | केसरकर यांना इन्कम टॅक्सची नोटीस, बंडाशी संबंध नसल्याचं म्हणत दिला दुजोरा

केसरकर यांना इन्कम टॅक्सची नोटीस, बंडाशी संबंध नसल्याचं म्हणत दिला दुजोरा

अनंत जाधव

सावंतवाडी : शिवसेनेचे आमदार शिंदे गटाबरोबर गेल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली असली तरी यामागे केंद्रीय यंत्रणा काम करत असून शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार हे या यंत्रणाच्या फेऱ्यात अडकले आहेत. यातून आमदार दीपक केसरकर हे ही सुटले नसून त्यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा आहे. दरम्यान, याला दीपक केसरकर यांनी दुजोरा दिला आहे. परंतु आम्ही केलेल्या बंडाशी कोणताही संबध नसल्याचा खुलासा ही त्यांनी केला आहे.

शिवसेनेचे काही आमदार बंडखोरी करून आसाममधील गुवाहाटी येथे गेले आहेत. यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, यातील काही आमदार केंद्रीय यंत्रणांच्या भीतीनं गेले असल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येत आहे. परंतु, आता सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनाही आयकर विभागाची नोटीस आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

काही दिवसापूर्वी आपल्या निवासस्थानावर ही नोटीस आली असून त्या नोटीसीचे उत्तर मी दिले आहे. नियमानुसार आयकर हा भरला जातो ती प्रकिया आहे. मात्र ही नोटीस आली असल्याची कबुली केसरकर यांनी दिली आहे.

Web Title: deepak kesarkar shiv sena got income tax notice maharashtra political crisis eknath shinde