शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

पाचही जणांविरोधात सक्षम पुरावे सर्वोच्च न्यायालयात मांडणार- दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 7:58 PM

बंदी घातलेल्या माओवाद्यांशी संपर्क ठेवल्याच्या कारणातून ज्यांना अटक झाली आहे

सावंतवाडी : बंदी घातलेल्या माओवाद्यांशी संपर्क ठेवल्याच्या कारणातून ज्यांना अटक झाली आहे, त्यांच्या विरोधात पोलिसांकडे सक्षम असा पुरावा आहे. तो आम्ही सर्वोच्च न्यायालयात मांडू, असा विश्वास राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. विचारवंतांच्या झालेल्या हत्यांचे प्रकरण महाराष्ट्र पोलिसांनीच उघडकीस आणल्याचा दावाही केसरकर यांनी यावेळी केला.शुक्रवारी एका कार्यक्रमानिमित्त मंत्री केसरकर हे सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित युवक ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्या चौकशीतून वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. पोलीस त्यांचा तपास करीत असून, त्यांचे लक्ष राज्यातील अन्य कोणत्या व्यक्ती मारण्याचा असेल, तशी नावे पुढे आली असतील, तर त्यांना पूर्णपणे पोलीस संरक्षण दिले जाईल, असे सांगितले. तसेच काहींना यापूर्वी संरक्षण दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.हिंदुत्व संघटनांशी संबंधित युवकांना पकडल्यानंतर लागलीच पुणे पोलिसांनी काही विचारवंतांना पकडले आहे. या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना पकडल्याची चर्चा थांबविण्यासाठी अशी कारवाई केली म्हणणे योग्य नाही. तुम्ही कधीही चर्चा करू शकता. हे व्यक्तिस्वातंत्र्य आहे, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. कर्नाटक पोलिसांमुळेच डॉ. दाभोलकर तसेच गोविंद पानसरे यांचे मारेकरी मिळाले का, यावर मंत्री केसरकर यांनी खुलासा केला आहे. महाराष्ट्र पोलिसांची यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळेच हा तपास लागला आहे. स्फोटांची माहिती कर्नाटक पोलिसांची नव्हती, तर महाराष्ट्र पोलिसांनीच ही सर्व लिंक शोधून काढली आहे. त्यामुळे राज्यातील पोलिसांचे कौतुक केलेच पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे पुणे प्रकरणात ज्या कॉम्रेडांना पकडले त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यावर मंत्री केसरकर यांनी प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. कोणी कोणाला भेटावे याच्या तपासावर कोणताही परिणाम होणार नाही. पोलीस आपले काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. जर कोण बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंध ठेवत असेल तर पोलिसांनी केलेली ही कारवाई योग्यच आहे,  असेही मंत्री केसरकर यावेळी म्हणाले.सावंतवाडीतील प्राध्यापकाने संरक्षण मागितल्यास देणारसावंतवाडीतील प्राध्यापकाचे नाव हे काही हिंदुत्ववादी संघटनांच्या निशाण्यावर होते. या वृत्ताला मंत्री केसरकर यांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल आणि कोणाला सोबत नसेल. तर त्याच्यावर पोलीस नजर ठेवतील, असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर