शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

उत्पादन कमी तरीही कांद्याचे दर निम्यावर : गतवर्षीपेक्षा क्विंटलमागे १५०० रुपयांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:51 AM

गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन कमी असूनही दर निम्यापेक्षा खाली आले आहेत. पावसाअभावी कांदा आकाराने लहान तयार झाल्याने त्याचा फटका दरावर झाला आहे.

ठळक मुद्देकांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहेतरी दोन महिन्यांनी दर तेजीत राहतील, असा अंदाज आहे.

-राजाराम लोंढे-

कोल्हापूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन कमी असूनही दर निम्यापेक्षा खाली आले आहेत. पावसाअभावी कांदा आकाराने लहान तयार झाल्याने त्याचा फटका दरावर झाला आहे. क्विंटलमागे दीड हजार रुपयांची घसरण झाली असून कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

नाशिक परिसरात कांद्याचे उत्पादन जास्त असल्याने सहाजिकच तेथील बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असते; पण कोल्हापुरातील उत्पादित किलोही कांदा बाजार समितीत न येता, राज्यातील दुसºया क्रमांकाची उलाढाल कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत होते. दरवर्षी सरासरी २५ लाख कांदा पिशव्यांची आवक बाजार समितीत होते. शंभर-सव्वाशे किलोमीटरची बाजारपेठ सोडून तीनशे-चारशे किलोमीटरवर माल येण्यामागे येथील बाजारातील पारदर्शकताच कारणीभूत आहे. राज्यातील इतर समित्यांच्या तुलनेत येथील दर नेहमीच चढे राहिले आहेत. पण यंदा कांद्याच्या दरात एकदमच घसरण झाल्याने शेतकºयांची अस्वस्थता वाढली आहे.

अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद या प्रमुख जिल्ह्यांत कांद्याचे रब्बी व खरीप हंगामात घेतात. सध्या बाजारात येत असलेला कांदा हा खरिपाचा आहे. यंदा पाऊस कमी झाला त्यात कांद्याला पोषक असे वातावरण नसल्याने बारीक कांदा तयार झाला. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ९३ हजार क्विंटल कांद्याची आवक राहिली पण दर प्रतिक्विंटल ५५०० रुपयांपर्यंत होता. यंदा ९० हजार क्विंटल आवक होऊनही ४०० ते २००० रुपयांपर्यंत दर राहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.रब्बी हंगामातील कांदाच चाळीत!रब्बी हंगामातील कांद्याची लागवड नोव्हेंबरमध्ये केली जाते. त्यानंतर साडेतीन महिन्यांने तो कांदा बाजारात येतो. या कांद्यात पाण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने तो टिकाऊ असतो. त्यामुळे रब्बी हंगामातील कांदा सहा-सात महिने चाळीत ठेवला तर तो अधिक मुरतो.दोन महिन्यांने दर तेजीतखरीप बरोबरच पाणीटंचाईमुळे यंदा कांद्याचे उत्पादन कमालीचे घटणार आहे. रब्बीचा कांदा चाळीत न ठेवता थेट शिवारातून बाजारात येणार आहे. त्यामुळे आता जरी कांद्याचे दर घसरले असले तरी दोन महिन्यांनी दर तेजीत राहतील, असा अंदाज आहे.गेल्या चार वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील आवक व दरदाम-महिना आवक क्विंटल किमान दर कमाल दर सरासरी दर प्रतिक्विंटलनोव्हेंबर २०१५ १ लाख ४० हजार ४५५ ५०० ५५०० १९००नोव्हेंबर २०१६ १ लाख १७ हजार ८३० १५० १५०० ७००नोव्हेंबर २०१७ ९३ हजार ६५६ १००० ५५०० २५००नोव्हेंबर २०१८ ९० हजार ३७८ ४०० २००० १००० 

पावसामुळे कांदा बारीक तयार झाला हे जरी खरे असले तरी अपेक्षेपेक्षा जादा दर घसरल्याने अडचणीत आलो आहे. सध्या तीन ते चार रुपयांनी कांदा विकून घरी मोकळे गोणपाटच घेऊन जावे लागत आहे. किमान २५ ते ३० रुपये दर मिळाला पाहिजे.- अरुण पवार (कांदा उत्पादक शेतकरी, मोहोळ)

टॅग्स :MarketबाजारMONEYपैसाbusinessव्यवसायFarmerशेतकरी