शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करात सैनिकांना सूट; राज्य सरकारचा स्तुत्य निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 14:00 IST

मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू..

ठळक मुद्दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सैनिकांना मालमत्ता करातून माफी देण्याचे केले होते जाहीर

संदीप वाडेकर- पुणे : राज्यातील आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. या आशयाचा शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत निर्गमित करण्यात आला असून मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला असल्याचे ग्रामविकास मंत्रालयाने स्पष्ट केले. ‘लोकमत’ ने यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सैनिकांना मालमत्ता करातून माफी देण्याचे जाहीर केले होते.राज्याचे कृषि आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनीही या मागणीसंदर्भात पाठपुरावा केला. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या आजी माजी सैनिकांनी जिवाची पर्वा न करता नि:स्वार्थपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेता त्यांचे मनोबल उंचावून उचीत सन्मान देण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला. असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. अशा करमाफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तींनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले...........................

संरक्षण दलातील शौर्य पदकधारक, सेवापदक धारक तसेच अशा पदकधारकांच्या विधवा किंवा त्यांच्या अवलंबितांना त्यांच्या वापरात असणाऱ्या एका निवासी इमारतीस ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी देण्याची तरतूद सध्या आहे. आता ही तरतूद व्यापक करून राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- हसन मुश्रीफ,ग्रामविकासमंत्री. 

..............................................

माजी सैनिकांना करातून सूट राज्य शासनाने मालमत्ता करातून माफी देण्याची तरतूद करून सैनिकांचा सन्मान केला आहे.देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या विधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या तरतुदीनुसार आधार मिळाला आहे. शक्ती महादेव साबळे, माजी सैनिक.

टॅग्स :PuneपुणेHasan Mushrifहसन मुश्रीफSoldierसैनिकgram panchayatग्राम पंचायतTaxकरAjit Pawarअजित पवारState Governmentराज्य सरकार