शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

युतीचं लवकर ठरवा, नाहीतर...; भाजपाची शिवसेनेला 'शाही' धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 20:28 IST

केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत राहून भाजपावरच टीका करणाऱ्या शिवसेनेला आज भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी थेट अल्टिमेटम दिल्याचे वृत्त आहे.

मुंबई - केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत राहून भाजपावरच टीका करणाऱ्या शिवसेनेला आज भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी अल्टिमेटम दिल्याचे वृत्त आहे. शिवसेनेने युतीबाबत आताच निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेची निवडणूक घेऊ, असा इशारा भाजपाध्यक्षांकडून सेनेला देण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भाजपाकडून अशाप्रकारचे कुठलेही अल्टिमेटम आले नसल्याचे सांगत शिवसेनेने या वृत्ताचे खंडन केले आहे.मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाने यासंदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर शिवसेनेकडून सातत्याने होत असलेल्या टीकेमुळे भाजपामध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. भाजपावर टीका करायची पण युतीबाबतचा संभ्रमही कायम ठेवायचा, अशी खेळी सेना नेतृत्वाकडून खेळण्यात येत आहे. त्यामुळे भाजपा नेतृत्वाकडून शिवसेनेला युतीबाबत आताच निर्णय घ्या, असे थेट अल्टिमेटमच देण्यात आले आहे. जर शिवसेनेने युतीबाबत आताच काही स्पष्ट भूमिका घेतली नाही, तर राज्यातील विधानसभा बरखास्त करून लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकाही घेतल्या जातील, असा इशारा अमित शाह यांनी शिवसेनेला दिला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी युतीबाबत शिवसेना अद्यापही स्पष्ट भूमिका घेत नसल्याने त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी भाजपाकडून ही चाल खेळण्यात येत असावी, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाह