शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू ; स्वारगेट पोलिसांची सीआयडीमार्फत चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 9:52 PM

पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) चौकशी करण्यात येणार आहे.  

पुणे : मोबाइल चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या युवकाचा स्वारगेट पोलीस स्टेशनमधील कोठडीत गुरुवारी मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) चौकशी करण्यात येणार आहे.  

           अजित अलापा पुजारी (वय २०, रा. सध्या घोरपडीगाव. मूळ रा. भद्रावती, जि. शिमोगा, कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. अजित हा मूळचा कर्नाटक राज्यातील आहे. बहिण आणि दाजी पुणे शहरात राहत असल्यामुळे तो चार दिवसापूर्वी पुण्यात आला होता. गुरुवारी दसरा असल्याने तो फुले आणण्यासाठी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याचा दाजी यलप्पा तिमाप्पा पुजारी (वय ३० रा. घोरपडीगाव) याच्यासोबत दुचाकीवरून मार्के टयार्ड येथे गेला होता. दरम्यान तेथे साध्या वेशात असलेल्या दोन पोलिसांनी मोबाईल चोरल्याच्या संशयावरून अजितसह यलप्पाला ताब्यात घेतले आणि जीपमध्ये बसवून स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आणले.

         दोघांकडे पोलिसांनी दोघांकडे चौकशी सुरू केली. मात्र अजितला मराठी आणि हिंदी समजत नव्हती. पोलिसांनी मराठीत बोलत अजितला बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे पोटात आणि छातीमध्ये वेदना होत असल्याचे तो पोलिसांना सांगत होता. मात्र तरी मारहाण सुरूच होती. वेदना वाढल्याने पोलिसांनी त्याला दोन गोळ्या दिल्याचे यलप्पाने सांगितले. दरम्यान, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तो अचानक कोसळला आणि कोठडीतच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यास ससून रूग्णालयात घेवून गेले तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. अजितचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा दाजी यलप्पाला पकडून ठेवले होते. शुक्रवारी पहाटे दोन वाजता बी. टी. कवडे रोड येथे त्याला सोडून देण्यात आले. अजितच्या पाठीवर तसेच शरिरावर मारहाणीच्या खुनाही दिसून आल्या. दरम्यान, पोलिसांनी यलप्पाच्या घोरपडीगाव येथील घराची झडती घेतली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यल्लप्पा येल्लूर यांनी सांगितले.   

नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

अजितच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी स्वारगेट पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली होती. मारहाण करणा-या आरोपी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. मात्र, पोलीस तक्रार घेत नसल्याने त्यांनी वडार समाज संघटनांशी संपर्क साधला. संघटनेच्या पदाधिका-यांनी पोलीस आयुक्त कार्यालय, सीआयडी कार्यालयात धाव घेत अधिका-यांची भेट घेतली. मात्र, कोणीही दाद देत नसल्याने दिसून आले. शुक्रवारी सकाळपासून ससून रुगणालयातील शवागार तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर विविध संघटनांमार्फत ठिय्या आंदोलन सुरू केले. यामध्ये वडार समाजाचे पुणे शहराध्यक्ष संजय डोंगरे, यल्लप्पा येल्लूर, भाजपा युवा मोर्चा ए. एम. एस. सोशल फाउंडेशनचे सौरभ शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

प्रतिक्रिया : पोलीस कोठडीत कोणाचाही मृत्यू झाल्यानंतर तहसिलदाराच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात येतो. तसेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर मृत्यू का झाला हे स्पष्ट होईल.  

रविंद्र रसाळ, प्रभारी सहायक आयुक्त, स्वारगेट विभाग

टॅग्स :PuneपुणेSwargateस्वारगेटPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू