मॅरेथॉनमध्ये तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: December 29, 2014 06:00 IST2014-12-29T06:00:57+5:302014-12-29T06:00:57+5:30

मॅरेथॉनमध्ये धावताना एका तरुण अधिकाऱ्याला जीव गमवावा लागला. ही घटना नागोठणे येथे घडली. ग्लाडवीन फिलीप पी.एस. फिलीप कुट्टी

Death of the youth in the marathon | मॅरेथॉनमध्ये तरुणाचा मृत्यू

मॅरेथॉनमध्ये तरुणाचा मृत्यू

नागोठणे : मॅरेथॉनमध्ये धावताना एका तरुण अधिकाऱ्याला जीव गमवावा लागला. ही घटना नागोठणे येथे घडली. ग्लाडवीन फिलीप पी.एस. फिलीप कुट्टी (३०) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. धीरूभाई अंबानी यांच्या जन्मदिनानिमित्त येथील रिलायन्सच्या निवासी संकुलात रविवारी सकाळी ही स्पर्धा घेण्यात आली.
ग्लाडवीन हे नागोठणे रिलायन्सचे अधिकारी होते. ते निवासी संकुलातील सी-८७ या सदनिकेत राहत.
सकाळी ९च्या सुमारास इतर स्पर्धकांबरोबर कुट्टी धावू लागले. संकुलातील बी टाईप रस्त्यावर आले असता त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे
जागीच निधन झाले. य्ग्लाडवीन यांचे शवविच्छेदन करण्यात आले आणि नंतर त्यांचे पार्थिव केरळमधील मूळ गावी विमानाने रवाना करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Death of the youth in the marathon