शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

उपचारांअभावी विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: December 27, 2014 04:22 IST

विनोबा भावे आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा मलेरियाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच उपचारांअभावी आणखी

एटापल्ली (जिग़डचिरोली) : विनोबा भावे आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा मलेरियाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच उपचारांअभावी आणखी एक विद्यार्थी दगावल्याचे उघडकीस आले़ विशेष म्हणजे ताप आल्याने उपचार न करता त्याला पुजाऱ्याकडे नेण्यात आले़ उपचार वेळीच न मिळाल्याने या मुलाचा मृत्यू झाला़ पुजाऱ्याकडे उपचार करण्याची चूक मुलाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याची कबुली मृत विद्यार्थ्याच्या पित्याने दिली़ भूतबाधा टाळण्यासाठी शाळा खोल्यांना लिंबू-मिरची बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने उघडकीस आणला होता़ या कृत्याचा अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेसह समाजातील विविध स्तरावर निषेध व्यक्त करण्यात आला़ प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत अंधश्रद्धेला खतपाणी घातले जाईल, असे कृत्य टाळण्यात येईल, अशी भूमिका घेतली़ मात्र, दुसऱ्याच दिवशी याच आश्रमशाळेतील दुलसा चैतू उईके या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा उपचारांअभावी मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़ एटापल्ली तालुक्यातील हाचबोळी येथील चैतू उईके यांना दुलसा व देवसू ही दोन मुले असून, ते विनोबा भावे आश्रमशाळेत शिकतात. चैतू यांनी १९ डिसेंबरला दुलसाला गावी आणले होते़ घरी आल्यानंतर २३ डिसेंबर रोजी त्याला ताप आला़ उपचार न करता आईने त्याला गर्देवाडा येथे पुजाऱ्याकडे नेले़ यात बराच वेळ गेल्याने त्याची प्रकृती अधिकच बिघडली़ चैतू घरी आल्यानंतर त्यांनी बुधवारी दुलसाला एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन त्याला अहेरी उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर २५ डिसेंबर रोजी डॉक्टरांनी त्याला गडचिरोलीच्या जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, गडचिरोलीला पोहोचण्यापूर्वीच गुरुवारी दुपारी दुलसाचा दुर्दैवी मृत्यू झाला. (प्रतिनिधी)