आनंदवनमधील स्वरानंदनवनच्या बसला अपघात, विकास आमटे यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 13:25 IST2017-12-17T10:27:34+5:302017-12-17T13:25:44+5:30
आनंदवनमधील स्वरानंदनवनच्या बसला रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात डॉ. विकास आमटे यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला असून, चार ते पाच जण जखमी झाले आहेत.

आनंदवनमधील स्वरानंदनवनच्या बसला अपघात, विकास आमटे यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू
चंद्रपूर - आनंदवनमधील स्वरानंदनवनच्या बसला रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात डॉ. विकास आमटे यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. आनंदवनमधील दिव्यांग विद्यार्थ्यांचा ऑर्केस्ट्रा असलेल्या स्वरानंदनवनचा काल रात्री मूर्तिजापूर येथे कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आटोपून ही मंडळी माघारी परतत असताना पहाटे पावणे पाचच्या सुमारास कलाकारांच्या बसची उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर येथील कार्यक्रम आटोपून परतताना आनंदवन स्वरानंदवनच्या बसची उभ्या ट्रकला जबर धडक बसली. या अपघातात डॉ. विकास आमटे यांचे सहकारी बाळू माटे यांचा जागीच मृत्यू झाला. सहा जण जखमी झाले. पैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात चंद्रपूर-नागपूर मार्गावरील खांबाडा-टेमुर्डा दरम्यान रविवारी पहाटे घडला. अक्षय राऊत व मेघराज भोयर या दोघांवर सेवाग्राम येथे उपचार सुरू आहे. अन्य चार जण किरकोळ जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार करून सुटी देण्यात आल्याचे सेवाग्राम रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.