शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

रोज ‘मरे’ त्याला...

By admin | Updated: April 24, 2015 01:14 IST

ओव्हरहेड वायरच्या तांत्रिक समस्येसह पॉवर डाऊनच्या समस्येने मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी कोलमडल्याने रेल्वे प्रवाशांना त्याचा फटका बसला

डोंबिवली : ओव्हरहेड वायरच्या तांत्रिक समस्येसह पॉवर डाऊनच्या समस्येने मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी कोलमडल्याने रेल्वे प्रवाशांना त्याचा फटका बसला. ठाणे-मुलुंड मार्गावरील अप दिशेला कोपरी पुलाजवळ ओव्हरहेड वायरची समस्या आणि मुंब्रा-ठाणे मार्गावर पॉवर डाऊन झाल्याने अप मार्गावर या समस्या उद्भवल्या.ओएचईची समस्या सकाळी १०.१५ ते ११ दरम्यान तर त्याच कालावधीत मुंब्रा येथे पॉवर डाऊनची समस्या उद्भवल्याची माहिती सुरक्षा विभागाने दिली. मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावर सकाळच्या वेळेत ओएचईची (ओव्हर हेड इक्विपमेंट्स) समस्या उद्भवल्याने मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या ठाण्याजवळ एकामागोमाग एक अडकून पडल्या. त्यामुळे ठिकठिकाणी प्रवाशांची गैरसोय झाली. ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या लोकल गाड्या काही कालावधीनंतर अप जलदमार्गे वळविल्या. या घटनेमुळे डाऊनमार्गे डोंबिवली-कल्याणकडे येणाऱ्या गाड्याही खोळंबल्या होत्या, अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. डाऊन मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही या बिघाडामुळे फटका बसला.