शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मृतदेह रुद्रगौडाचा?

By admin | Updated: October 29, 2015 01:11 IST

ष्ठ कन्नड साहित्यीक आणि पुरोगामी नेते एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकऱ्याच्या रेखाचित्राशी साम्य असणारा एक मृतदेह खानापूरच्या जंगलात सापडला

बेळगाव : जेष्ठ कन्नड साहित्यीक आणि पुरोगामी नेते एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकऱ्याच्या रेखाचित्राशी साम्य असणारा एक मृतदेह खानापूरच्या जंगलात सापडला. हा मृतदेह संशयित मारेकरी सनातनचा बेपत्ता साधक रुद्रगौडा पाटील याचाच असल्याचे वृत्त सोशल मिडियावर फिरु लागले.काही वाहिन्यांनीही ते देण्यास सुरवात केल्यामुळे बुधवारी खळबळ उडाली. दिवसभर चर्चेचा विषय झाला . पण पोलिसांनी किंवा इतर तपास यंत्रणांनी हा मृतदेह रुद्रगौडाचा असल्याच्या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.उत्तर विभागाचे पोलीस महासंचालक उमेशकुमार यांनी देखील मृतदेहाची ओळख पटली नसल्याचे सांगितले.१८ आॅक्टोबर रोजी खानापूर जवळील माणिकवाडी येथील जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. पोलिसांनी त्या मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर विच्छेदन करून तो मृतदेह बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवला होता. ओळख न पटल्यामुळे त्या मृतदेहाचे मंगळवारी पोलिसांनी दफन केले. जंगलात सापडलेल्या मृतदेहाचे छायाचित्र खानापूर येथील एका व्यक्तीने मोबाईलवर काढले होते . तो मृतदेह आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर जाहीर केलेले मारेकऱ्याचे रेखाचित्र यात साम्य असल्याचे छायाचित्र काढलेल्या व्यक्तीच्या ध्यानात आले. नंतर त्याने मृतदेहाचे छायाचित्र आणि कलबुर्गी यांच्या मारेकऱ्याचे पोलिसांनी जाहीर केलेले रेखाचित्र सोशल मिडीयावर पोस्ट केले. त्यानंतर काही वाहिन्यांनी कलबुर्गींच्या मारेकऱ्याच्या चेहऱ्याशी अज्ञात मृतदेहाचे साम्य असल्याची ब्रेकिंग न्यूज दाखवायला सुरु केल्यावर सापडलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हा मडगाव येथे २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बेपत्ता असलेल्या रुद्रगौडा पाटीलचा असावा अशी चर्चा रंगू लागली. (प्रतिनिधी)वयातील फरकअज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे वय २५ ते ३० दरम्यान असण्याची शक्यता असून, रुद्रगौडाचे वय सध्या ४० किंवा त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मृतदेह रुद्रगौडाचा असण्याची शक्यता कमी असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.मृतदेह पुन्हा बाहेर काढणारकर्नाटक सीआयडीचे एक पथक आज गुरुवारी जिल्ह्यात दाखल होत आहे. या पथकाकडून खानापूर पोलिसांनी दफन केलेला तो मृतदेह पुन्हा बाहेर काढून, त्याचा पुन्हा पंचनामा केला जाण्याची शक्यता आहे.