दावोस परिषदेमुळे येणार १८ देशांमधून थेट गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:13 IST2026-03-17T10:13:28+5:302026-03-17T10:13:45+5:30
मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने ३१ लाख २५ हजार ८८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले ...

दावोस परिषदेमुळे येणार १८ देशांमधून थेट गुंतवणूक
मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने ३१ लाख २५ हजार ८८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे १८ देशांमधून थेट परकीय गुंतवणूक राज्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
दावोस येथील गुंतवणुकीचा एक भाग म्हणून टाटा समूहासोबत मुंबईजवळ देशातील पहिली ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्याचा प्रस्ताव आहे. रायगड-पेण ग्रोथ सेंटर विकसित करण्यात येईल, असे सामंत म्हणाले.
महाराष्ट्राला डिजिटल कॅपिटल बनविणार
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील जागतिक कंपनी एनव्हिडियासोबत झालेल्या चर्चेमधून महाराष्ट्राला ‘डिजिटल कॅपिटल’ बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडणार आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हे आणि शहरांसाठी वातावरणीय कृती आराखडे तयार करण्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणे आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्यासाठी सरकार आवश्यक उपाययोजना करणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.