शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट बियाणे, शेतक-यांना नुकसान भरपाई!

By admin | Updated: August 21, 2015 22:44 IST

ग्राहक मंचचे आदेश, महाबीजला दोन तर कृषिधनला दीड लाखाचा फटका.

अकोला :महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) व कृषिधन बियाणे कंपनीने दहीगाव गावंडे येथील शेतकर्‍यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री केल्याप्रकरणी या दोन्ही कंपन्यांनी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष एस. एम. उंटवाले यांनी शुक्रवारी दिले. महाबीजने १ लाख ९९ हजार ५00 रुपये तर कृषिधन कंपनीने १ लाख ५६ हजार रुपये नुकसान भरपाई शेतकर्‍यांना ४५ दिवसांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. बियाणे पेरणी केल्यानंतर ९0 टक्के बियाणे उगवलेच नव्हते, अशी तक्रार या शेतकर्‍यांनी केली होती. दहीगाव गावंडे येथील शेतकरी नरेश सुरेश काळे यांनी २0१४ च्या खरीप हंगामासाठी महाबीजकडून सुमारे ३३ हजार ३९0 रुपयांच्या ३0 किलो वजनाच्या १४ बॅग सोयाबीन बियाणे खरेदी केली होती. त्यांची पत्नी नयना नरेश काळे यांनी कृषिधन कंपनीकडून २२ हजार ५00 रुपयांच्या ३0 किलो वजनाच्या ९ बॅग सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. शेतीची पूर्ण मशागत करून आवश्यक पाऊस झाल्यानंतर काळे दाम्पत्याने एक हेक्टर ६२ आर शेतीमध्ये महाबीज, तर एक हेक्टर ६३ आर शेतीमध्ये कृषिधन कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली; मात्र ८ ते १0 दिवसांचा कालावधी उलटल्यावरदेखील दोन्ही शेतात केवळ ५ ते १0 टक्केच बियाणे उगवले. उर्वरित ९0 टक्के बियाणे न उगवल्यामुळे त्यांनी या प्रकरणाची तक्रार पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे केली. कृषी अधिकार्‍यांनी ४ ऑगस्ट २0१४ रोजी दोन्ही शेतीची पाहणी करून शेतातील तब्बल ९0 टक्के बियाणे उगवलेच नसल्याचा अहवाल दिला. या अहवालाच्या आधारे नरेश काळे व नयना काळे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली. ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष एस. एम. उंटवाले यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर नरेश काळे या शेतकर्‍याला महाबीज कंपनीने एक लाख ९९ हजार ५00 रुपये नुकसान भरपाई व ३ हजार रुपये न्यायिक खर्च देण्याचे आदेश दिले. यासोबतच नयना नरेश काळे या महिला शेतकर्‍याला कृषिधन बियाणे कंपनीने एक लाख ५६ हजार रुपये नुकसान भरपाई व ३ हजार रुपये न्यायिक खर्च देण्याचे आदेश तक्रार निवारण मंचने दिले. या दोन्ही शेतकर्‍यांना ही नुकसान भरपाई व खर्च ४५ दिवसांच्या आतमध्ये देण्यात यावा, सोबतच ८ टक्के व्याजही देण्याचे आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचने दिले आहेत. या प्रकरणी शेतकर्‍यांतर्फे अँड. जयेश गावंडे पाटील व अँड. दिनेश पोरे यांनी, तर महाबीजतर्फे अँड. मो. परवेज डोकाडिया यांनी कामकाज पाहिले.