शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

Dahi Handi 2022 : प्रो-कबड्डीप्रमाणे प्रो-दहीहंडी सुरू होणार, शासकीय नोकरीत 5% स्थान देणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 5:27 PM

Dahi Handi 2022 : गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल.

मुंबई - दहीहंडीच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रो-कबड्डीप्रमाणे प्रो-दहीहंडी सुरू होणार असल्याची घोषणा केली असून दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. गोविंदाना शासनाच्या इतर सुविधांचाही लाभ मिळणार आहे. यासोबतच शासकीय नोकरीत 5 टक्के स्थान देण्यात येणार आहे. तसेच दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. 

गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल. 

हा आदेश केवळ या वर्षीसाठी (वर्ष 2022) लागू राहील.  दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी पुढील अटी व शर्ती लागू 

दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे, न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे, गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी,  त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे, मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही, गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून 18 वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही, मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे, मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे तत्काळ अहवाल देणे आवश्यक आहे.  

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीEknath Shindeएकनाथ शिंदे