शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

''वायू'' चक्रीवादळ उद्या गुजरातला धडकणार : कोकण, गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 20:57 IST

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘वायू’ चक्रीवादळ हे गुरुवारी दुपारी द्वारका आणि वेरावळ दरम्यान धडकण्याची शक्यता आहे़.

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘वायू’ चक्रीवादळ हे गुरुवारी दुपारी द्वारका आणि वेरावळ दरम्यान धडकण्याची शक्यता आहे़.   या वादळामुळे सौराष्ट्र, कच्छ किनारपट्टी, गीर, अमरीली, सोमनाथ, डियु, जुनागड,पोरबंदर, राजकोट, जामनगर, देवभूमी, द्वारका आणि कच्छ या भागात त्याचामोठा दुष्परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे़. ‘वायू’ चक्रीवादळामुळे कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी १३ जून रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून सौराष्ट्र, कच्छ भागात जोरदार ते अतिवृष्टीहोण्याची शक्यता आहे़.  दक्षिण गुजरात भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ . ‘वायू’ चक्रीवादळ बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता वेरावळपासून २८० किमीतर पोरबंदरपासून ३६० आणि मुंबईपासून ३१० किमी अंतरावर होते़.  हे चक्रीवादळ ताशी १४ किमी वेगाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकरत आहे़.  या चक्रीवादळाचा सध्या ताशी १४० ते १५० किमी वेगाने वाहत आहे़.  हे चक्रीवादळ जेव्हा गुजरातला धडकेल, तेव्हा या वादळाचा वेग ताशी १५५ ते १६५ किमी असण्याची शक्यता आहे़.  त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. 

‘वायू’ चक्रीवादळामुळे गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ मार्गोवा ५१, देवगड ३४, ओझर ११, महाबळेश्वर ९ मिमी पावसाची नोंद झाली होती़. बुधवारी सांयकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबई १३, अलिबाग ११, रत्नागिरी ४५, पणजी ३०, डहाणु ६, महाबळेश्वर १८, पुणे, लोहगाव, सातारा येथे प्रत्येकी २ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. 

इशारा : १३ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाशी शक्यता़ विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट तर बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट़ १४ जून रोजी मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक  ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़. १५ व १६ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.  असून विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

टॅग्स :Cyclone Vayuवायू चक्रीवादळGujaratगुजरातgoaगोवाSea Routeसागरी महामार्गRainपाऊसweatherहवामान