Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाचा तडाखा! अमळनेरमध्ये झोपडीवर झाड कोसळून दोन बहिणी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 17:06 IST2021-05-16T16:22:22+5:302021-05-16T17:06:28+5:30
Cyclone Tauktae: जोरदार वादळामुळे खळ्यात असलेले झाड झोपडीवर कोसळले. या झोपडीखाली दाबले जाऊन दोन बहिणी ठार झाल्याची दुर्देवी घटना अंचलवाडी ता. अमळनेर येथे रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे.

Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाचा तडाखा! अमळनेरमध्ये झोपडीवर झाड कोसळून दोन बहिणी ठार
Cyclone Tauktae: जोरदार वादळामुळे खळ्यात असलेले झाड झोपडीवर कोसळले. या झोपडीखाली दाबले जाऊन दोन बहिणी ठार झाल्याची दुर्देवी घटना अंचलवाडी ता. अमळनेर येथे रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे.
ज्योती बल्लू बारेला ( १६) आणि रोशनी बल्लू बारेला (१०) अशी या ठार झालेल्या बहिणींची नावे आहेत. रणाईचे येथील राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदरकीसाठी आलेल्या बल्लू बारेला याने गावाबाहेर असलेल्या खळ्यात झोपडी बांधली होती.
रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वादळासह पाऊस सुरू झाला. काही कळण्याच्या आत खळ्यात असलेले चिंचेचे झाड कोसळले. या झाडाखाली झोपडी दाबली गेली. झोपडीत असलेली बल्लू याची मोठी मुलगी ज्योती आणि रोशनी या दोघी बहिणींचा जागीच ठार झाल्या.
गावचे सरपंच भगवान बवल पाटील, रंगराव पाटील, गोपाळ मुरलीधर पाटील यांच्यासह गावातील नागरिक व तरुण मदतीला धावून आले. संपूर्ण झोपडीच दाबली गेल्याने झाड कापून मुलींना व झोपडीतील साहित्य बाहेर प्रक्रिया सुरू होती.