शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 08:50 IST

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे

मुंबई - महाराष्ट्राच्या उत्तरेकडील किनाऱ्याकडे सरकणारे 'शक्ती' चक्रीवादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकले आहे. यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चक्रीवादळामुळे होणारे नुकसान कमी झाले आहे. परंतु विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतीय हवामान विभागाने (IMD) इशारा दिला होता की, शक्ती चक्रीवादळाचा ४ ते ७ ऑक्टोबर काळात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गवर प्रभाव पडेल. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांसह या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हे चक्रीवादळ वायव्य आणि ईशान्य अरबी समुद्रावर केंद्रित होते. ते द्वारकेपासून सुमारे ४२० किमी अंतरावर होते. आता ते  ओमानच्या मासिराह किनाऱ्याकडे सरकत असल्याचं समोर आले आहे. 

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. या दरम्यान वादळी वारे आणि उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज असून तशा सूचना हवामान विभागाने मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना दिल्या आहेत. तर सागरी सुरक्षितता आणि जीवितहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. आज हे वादळ ओमानच्या दिशेने सरकले असले तरी सोमवारी मात्र हे चक्रीवादळ वळण घेईल आणि त्याचा प्रवास उलट म्हणजे गुजरातच्या दिशेने सुरू होईल असंही सांगण्यात येत आहे. 

६ आणि ७ ऑक्टोबर रोजी कोकणपट्ट्यात मध्यम पाऊस

गेल्या काही वर्षांत अरबी समुद्रात ‘तौकते’ (२०२१) आणि ‘बिपरजॉय’ (२०२३) यांसारखी वादळे आली होती. परंतु बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळांची संख्या कमी आहे. या वादळाला ‘शक्ती’ हे नाव श्रीलंकेने सुचवलेले आहे. उष्ण कटिबंधात चक्रीवादळांना नाव देण्याची पद्धत आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रालगतच्या १३ देशांनी सुचवलेली नावे अशा वादळांना दिली जातात.रविवारी उत्तर भारतात हिमालयाकडे पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्स) तयार होईल. या बदलामुळे हवेतला ओलावा वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी कोकणपट्ट्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Shakti' Cyclone Looms in Arabian Sea; Maharashtra on Alert

Web Summary : Cyclone 'Shakti' shifts towards Oman, lessening Maharashtra's impact. Heavy rains are still possible in Vidarbha and Marathwada. Fishermen are warned, and coastal districts remain on high alert for potential heavy rainfall until October 7th. The cyclone may reverse course towards Gujarat later.
टॅग्स :cycloneचक्रीवादळRainपाऊसweatherहवामान अंदाज