शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

पवार कुटुंबात सध्या उद्भवलेला वाद तात्पुरता; तो घरात बसूनच मिटवला जाऊ शकतो: राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 16:32 IST

पवार कुटुंबाकडे नेहमीच एक आदर्श कुटुंब म्हणून पहिले जाते...

ठळक मुद्देआगामी काळात पुण्याची स्थिती नक्की बदलेल असा विश्वास

पुणे : पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसांत राम मंदिर आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विसंगत जाहीर भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे पवार कुटुंबात नवीन वाद उद्भवला आहे. मात्र पवार कुटुंबाकडे नेहमीच एक आदर्श कुटुंब म्हणून पहिले जाते. त्यामुळे या हा निर्माण झालेला वाद तात्पुरत्या स्वरूपाचा असून त्यावर घरात बसूनच मिटवला जाऊ शकतो, या शब्दात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पार्थ पवार आणि पवार कुटुंब यांच्यात निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले. तसेच पार्थ पवार हे माझे चांगले मित्र असून त्यांच्याशी त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर सविस्तर बोललो आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. टोपे म्हणाले, गेल्या काही दिवसांतील अहवालानुसार कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येत हळूहळू बदल होतो आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्याची स्थिती नक्की बदलेल असा विश्वास आहे.त्याचप्रमाणे चाचण्यांत वाढ, ऑक्सिजन,आयसीयू खाटा यांची उपलब्धता वाढवण्यावर आमचा भर आहे. तसेच जे खासगी रुग्णालये कोरोना बाधितांच्या उपचारासाठी अवास्तव बिले लादत आहे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यासाठी विशेष प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जास्तीचे बिले स्वीकारणाऱ्या रुग्णालयांवर आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे पूर्ण आदेश देण्यात आले आहे. 

पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मात्र यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांवर कोरोनाचे संकट असल्याने आपण जबाबदारीपूर्वक वागणे गरजेचे आहे. त्यामुळेच यावर्षी सध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करत प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करावे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने जे काही नियम गणेश उत्सव काळासाठी तयार केले आहे त्याचे कटाक्षाने पालन करण्यात यावे. मी पुणेकरांच्या गणेश उत्सवाशी जोडल्या गेलेल्या भावना समजू शकतो कोरोना संकटामुळे आपल्या नेहमीच्या उत्साहाला मुरड घालणे गरजेचे आहे,असे टोपे यांनी सांगितले.   सुशांतसिंह म्हणाले, सुशांत सिंग प्रकरणी एक गोष्ट निश्चितच सांगू शकतो ती म्हणजे मुंबई पोलिसांनी याप्रकरणाचा  प्रकारे तपस केला. पण आता हे प्रकरण न्यायालयात आहे. आणि आपला देश न्याय संस्थेला प्रमाण मानतो.त्यामुळे सर्वोच्च न्यालयालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर असून यापुढे राज्य सरकारकडून सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्यात येईल.  

टॅग्स :PuneपुणेRajesh Topeराजेश टोपेSharad Pawarशरद पवारparth pawarपार्थ पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस