गायीचे दूध दोन रुपयांनी महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 04:40 IST2019-06-05T04:40:30+5:302019-06-05T04:40:39+5:30

गेल्या आठवड्यातच काही खासगी दूध व्यावसायिकांनी गायीच्या दुधाच्या किमतीत २ रुपयांनी वाढ केली आहे

Cumin milk has increased by two rupees | गायीचे दूध दोन रुपयांनी महागले

गायीचे दूध दोन रुपयांनी महागले

पुणे : गायीच्या दूध दरामधे प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभेत मंगळवारी घेण्यात आला. ही दरवाढ ८ तारखेपासून लागू होणार आहे.

दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज येथील पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सभागृहात बैठक झाली. त्यात दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. या दूध संघाचे राज्यभरात ११० सदस्य आहेत. गेल्या आठवड्यातच काही खासगी दूध व्यावसायिकांनी गायीच्या दुधाच्या किमतीत २ रुपयांनी वाढ केली आहे. पाठोपाठ जिल्हा दूध उत्पादक संघ आणि उर्वरित खासगी व्यावसायिकांनी भाववाढीचा निर्णय घेतला. म्हशीच्या दुधाचे दर कायम राहणार आहेत.

Web Title: Cumin milk has increased by two rupees