जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू; जमावाकडून गाडीची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 12:51 IST2019-09-30T11:01:58+5:302019-09-30T12:51:56+5:30
बार्शी तालुक्यातील शेलगावमध्ये गाडीला अपघात

जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू; जमावाकडून गाडीची तोडफोड
सोलापूर: जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका व्यक्तीला उडवल्याची घटना सोलापुरात घडली आहे. यानंतर संतप्त जमावानं सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली. अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील शेलगावमध्ये हा अपघात झाला. अपघातावेळी तानाजी सावंत गाडीमध्ये नव्हते, अशी माहिती मिळत आहे.
तानाजी सावंत यांचे नातेवाईक प्रवास करत असलेल्या फॉर्च्युनर कारनं दुचाकीला धडक दिली. बार्शी-लातूर बायपास रोडवरील बीआयटी महाविद्यालयाजवळ असलेल्या शेळगाव फाटयाजवळ हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील शामकुमार देविदास व्हळे (वय 40 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. ते शेळगावचे रहिवासी होते. यानंतर संतप्त जमावानं सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली.