दोन लाख हेक्टरवरील पिकांची गारपीट व अवकाळी पावसामुळे झाली माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 12:00 PM2023-04-05T12:00:07+5:302023-04-05T12:01:14+5:30

मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

Crops on two lakh hectares were soiled due to hailstorm and unseasonal rain | दोन लाख हेक्टरवरील पिकांची गारपीट व अवकाळी पावसामुळे झाली माती

दोन लाख हेक्टरवरील पिकांची गारपीट व अवकाळी पावसामुळे झाली माती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात मार्च महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती व फळपिकांच्या बाधित क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अवकाळीने राज्यभरातील एक लाख ९९ हजार ४८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.  या क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. नुकसानभरपाईसंदर्भात जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून, तत्काळ निधी वितरित करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना मार्च महिन्यात दोनदा अवकाळी पावसाचा सामना करावा लागला. ४ ते ९ मार्च आणि १५ ते २१ मार्च या कालावधीत हा अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे कडधान्य, फळ पिके, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्रा, मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले. 

दि. ४ ते ९ मार्च २०२३ या कालावधीत राज्यातील ३८ हजार ६०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, १५ ते २० मार्च या कालावधीत १ लाख ६० हजार ८८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

जिल्हानिहाय बाधित क्षेत्र
जिल्हा     बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • ठाणे      ३९८ 
  • पालघर    ४,३७७ 
  • रायगड    ५९८
  • सिंधुदुर्ग    ४३  
  • नाशिक    ११,८७५ 
  • धुळे    ९,५२२ 
  • नंदुरबार    ३,०५२ 
  • जळगाव      ११,४९१  
  • अहमदनगर     १२,१९८ 
  • पुणे     ५७९ 
  • सोलापूर    ३९७७  
  • सातारा    ४८४  
  • सांगली      १ 
  • छ. संभाजीनगर     २३,९१४


जिल्हा     बाधित क्षेत्र

  • बीड     १६,९४२ 
  • जालना     १५,०८० 
  • परभणी    ६८१२
  • हिंगोली    ५६०४ 
  • लातूर    ११,७९५ 
  • नांदेड      २३,८२१  
  • धाराशिव     १५२६ 
  • बुलडाणा     ३१४७ 
  • वाशिम    ४९८१  
  • अमरावती     ९०५८ 
  • यवतमाळ    ६५३९  
  • अकोला     ३५६२ 
  • वर्धा    ८६ 
  • गाेंदिया    १४२ 
  • भंडारा     २२७ 
  • चंद्रपूर     २२१ 
  • गडचिरोली     २४६ 
  • नागपूर     ७१८८

सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बीड, जालना या जिल्ह्यात झाले आहे.

Web Title: Crops on two lakh hectares were soiled due to hailstorm and unseasonal rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी