शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

ई-टेंडरिंग पद्धतीवरून सरकारवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2015 02:27 IST

आम्ही भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही. भ्रष्टाचार होऊ नये याच मताचे आम्ही आहोत. पण ई-टेंडरिंगच्या नावाखाली विकासकामेच होत नसतील तर सरकार काय कामाचे, असा सवाल

मुंबई : आम्ही भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही. भ्रष्टाचार होऊ नये याच मताचे आम्ही आहोत. पण ई-टेंडरिंगच्या नावाखाली विकासकामेच होत नसतील तर सरकार काय कामाचे, असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ई-टेंडरिंग पद्धतीवर ताशेरे ओढले.शिवसेना विभाग क्रमांक १ आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने त्रिमूर्ती, नॅशनल पार्क येथे एक लाख झाडे लावण्याच्या शुभारंभाप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, ३ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चीक कामांसाठी ई-टेंडरिंग करणे सक्तीचे करण्यात आले आहे. तीन लाख काय तीन रुपयांचे ई-टेंडरिंग करा, पण कामे करा. प्रत्यक्षात कामे किती होतात. कामेच होत नसतील तर ई-टेंडरिंगचा काय उपयोग? भ्रष्टाचार होतो म्हणून कामच करायचे नाही, हे योग्य नाही. कोणतीही पद्धत अवलंबा पण कामे होऊ द्या, असे सांगत याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात ५० हजार झाडे लावण्यात आली आहेत. शिवाय प्रकाश सुर्वे आणि प्रकाश कारकर यांनी या वेळी दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांचा धनादेश उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला. (प्रतिनिधी)आदिवासी पाड्यांची पुनर्वसनाची मागणी१० आदिवासी पाड्यांचे याच परिसरात पुनर्वसन करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. यावर उद्धव यांनी तुम्ही आराखडा द्या. काम नियमात बसणारे आणि करता येणारे असेल तर या पाड्यातील ३० हजार रहिवाशांचे नक्कीच पुनर्वसन करू, असे नमूद केले.