शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चाकण येथे प्राथमिक शाळेतील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण; शिक्षकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 22:00 IST

हा प्रकार जिल्हा परिषदेच्या शाळेत व त्यांच्या घरी घेत असलेल्या खासगी क्लासमध्ये अनेक महिन्यांपासून नव्हे तर दोन वर्षांपासून चालू होता.

ठळक मुद्देपीडित मुलींच्या पालकांना बोलावून जबाब घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरु संबंधित शिक्षकाला शिक्षकाला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने सूर्य हॉस्पिटलमध्ये दाखल

चाकण : मेदनकरवाडी ( ता.खेड ) येथील इयत्ता सातवीच्या वगार्तील सहा ते सात मुलींवर एका शिक्षकाने अत्याचार करून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापक व आणखी काही शिक्षकांवर माहिती लपविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मुख्य आरोपी शिक्षकासह चारही शिक्षकांचे निलंबनाचे आदेश देण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी लिंबाजी डोंबे ( वय ५०, रा. मेदनकरवाडी, चाकण, ता.खेड, जि. पुणे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव असून हा प्रकार जिल्हा परिषदेच्या शाळेत व त्यांच्या घरी घेत असलेल्या खासगी क्लासमध्ये अनेक महिन्यांपासून नव्हे तर दोन वर्षांपासून चालू होता. याबाबत वरिष्ठांकडे गुप्त तक्रार गेल्यानंतर अधिकारी शाळेत चौकशी साठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. शाळेमध्ये हा प्रकार १ आॅक्टोबरला समजला होता, असे माजी सरपंच रामदास मेदनकर यांनी सांगितले. तरीही शिक्षकांनी हि माहिती आमच्यापासून दडवून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. पीडित मुलींच्या पालकांना बोलावून जबाब घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. मेदनकरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत एकूण ६०० पटसंख्या असून शाळेत केवळ ३४ मुले स्थानिक व इतर मुले हि बाहेर गावाहून आलेल्या कामगार वगार्तील आहे. या प्रकारामुळे मुली भयभयीत झाल्या असून त्यांनी भीतीपोटी हा प्रकार अद्याप पालकांना सांगितला नाही. मात्र शाळेतील दोन शिक्षिकांना हा प्रकार मुलींनी सांगितला होता. या शिक्षकाकडे इयत्ता सातवीत शिकवण्यासाठी होती. हा प्रकार कळताच मुख्याध्यापकांनी त्यांच्याकडून हा वर्ग काढून घेऊन मुलांचा वर्ग दिला होता. खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांनी शाळेत भेट देऊन मुलींचे जबाब घेतले आहेत. वरिष्ठ अधिकारी शाळेत चौकशीसाठी आले असता संबंधित शिक्षकाला चक्कर आल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथोमपचार घेऊन नंतर सूर्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या शिक्षकाला हृदय विकाराचा तीव्र झटका आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहे. उशिरा पर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम चालू असल्याने आणखी किती जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, हे समजू शकले नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकsexual harassmentलैंगिक छळSchoolशाळाPoliceपोलिसRapeबलात्कार