शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील भाजपा आमदार योगेश टिळेकरांवर खंडणीचा गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 21:22 IST

५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

ठळक मुद्देकेबल कंपनीकडे मागितले ५० लाखखंडणी मागणे, धमकावणे या कलमांन्वये टिळेकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : आॅप्टीकल फायबरचे कामे करणा-या व्यवसायिकाला धमकावून व कंपनीच्या कर्मचाºयांना त्रास देऊन देऊन ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे (सर्व रा. कोंढवा बुद्रुक, ता. हवेली) यांच्याविरूध्द कोंढवा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याप्रकरणी रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (वय ५५, रा. सरगम सोसायटी, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बऱ्हाटे एरंडवणे भागातील इ-व्हिजन टेली इन्फ्रा प्रा. लि. कंपनीत व्यवस्थापक आहेत. या कंपनीकडून विविध माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना सेवा पुरविले जाते. कात्रज-कोंढवा रोड या भागात  केबलचे काम चालू होते. या तिघांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काम थांबविण्यास सांगितले.  कामठे यांनी वारंवार फोन करून व समक्ष भेटून त्यांच्या मतदार संघात काम करण्यासाठी  पैशाची मागणी केली. कंपनीच्या केबल चोरणे, धमकावणे असे प्रकारही याकाळात घडले. रविवारी ७ सप्टेंबर रोजी काम सुरू ठेवायचे असेल तर पन्नास लाख रुपये द्याावे लागतील, अधी धमकी देण्यात आली होती, असे बऱ्हाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर धमकी देण्याचे प्रकार सुरू होते. त्यामुळे  त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार खंडणी मागणे, धमकावणे या कलमांन्वये टिळेकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टिळेकर हे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही आहे. यापूवीर्ही त्यांच्यावर विकास आराखड्यातील आरक्षण बदलून बांधकाम व्यावसायिकाचा फायदा करून देण्यासाठी १ कोटी रुपयांची मर्सिडिझ गाडी लाच स्वरुपात स्वीकारल्याचा आरोप झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते वसंत मोरे यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. ...............भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात तक्रार आली होती. त्यानुसार चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी पैसे मागणे आणि कामात अडथळे आणल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून त्यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील चौकशी सुरू आहे.  शिवाजी बोडके, सहपोलीस आयुक्त

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBJPभाजपाMLAआमदार