शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

हाणामारी प्रकरणी सभापतीसह २७ जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: August 3, 2014 00:25 IST

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोन गटात काठय़ा, दगड व पाईपने हाणामारीची घटना घडली.

खानापूर : नजीकच्या कोठारी बुद्रुक गावात १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२.३0 वाजताच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोन गटात काठय़ा, दगड व पाईपने हाणामारीची घटना घडली. या घटनेत तीन जण जखमी झाले.या प्रकरणी दोन्ही गटांनी पातूर पोलिस स्टेशनमध्ये परस्परांविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पंचायत समितीच्या सभापतीसह २७ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे.सदर घटनेबाबत पोलिस स्टेशनमध्ये कोठारी येथील रहिवासी फिर्यादी शमीमखाँ मियाखाँ पठाण यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ .३0 वाजताच्या दरम्यान त्यांच्या मुलांच्या ऑटोरिक्षासमोर तितली भवराचा जुगार खेळणार्‍या गावातील काही लोकांना त्यांच्या मुलांनी मनाई केली होती.या बाबीने चिडून जाऊन गावातील रघुनाथ उत्तम शिंदे, बाजीराव शिंदे, पातूर पंचायत समितीचे सभापती संजय चिंतामण लोखंडे, गजानन शिंदे, इशा शिंदे, ज्ञानेश्‍वर शिंदे, रामेश्‍वर शिंदे,आप्पा गंगा शिंदे, विश्‍वनाथ सोळंके,उत्तम शिंदे, शिवाजी शितोळे,यांच्यासह दोन महिलांनी त्यांच्या मुलास शिवीगाळ करून व जीवे मारण्याची धमकी देऊन काठय़ा, दगड व पाईपने मारहाण केली व जखमी केले.या घटनेत उत्तम शिंदे हे जखमी झाले असून, त्यांना सवरेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.या प्रकरणी वर उल्लेख केलेल्या लोकांविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या १४३, १४७,१४८,१४९, ३२३,३२४,३३६ ५0४ व ५0६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, बाजीराव शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी दुसर्‍या गटातील रघुनाथ उत्तम शिंदे यांनी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार ते १ ऑगस्ट रोजीदुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास त्यांच्या आई-वडिलांसह देवदर्शनास जात असताना जुन्नू हमीदखाँ पठाण, शमीमखाँ मियाखाँ पठाण, शहजादखाँ शमीमखॉँ पठाण, शहबाजखाँ शमीमखाँ पठाण, अस्लमखाँ पठाण, शेख जुबेर शेख हमीद , शेख हमीद, अर्शदखाँ पठाण, शे.शरिफखाँ शे.अजीद, शे.राजीक शे.अजीज, परवेजखाँ पठाण, शहीमखाँ पठाण यांनी त्यांना जोगड्या म्हटले.यावरून वाद झाला असता वर उल्लेख केलेल्या लोकांनी फिर्यादी व त्याच्या नातेवाइकांना शिवीगाळ करीत मारण्याची धमकी देऊन काठय़ा, पाईप व दगडांनी मारहाण केली. याबाबतच्या तक्रारीवरून वर उल्लेख केलेल्या लोकांविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ३३६ ५0४ व ५0६ कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील काही आरोपी फरार असून पातुर पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहे.