शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाची व्हॉट्स अ‍ॅपवर कोविड-१९ हेल्पलाइन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 17:05 IST

कोविड हेल्पलाइन महाराष्ट्र ही एक स्वयंचलित 'चॅटबोट'सेवा

ठळक मुद्देकोविड हेल्पलाइन महाराष्ट्रवर संदेश पाठवून शंकांचे निरसन करावे.

पुणे: नागरिकांच्या मनात कोरोना विषाणूसंदर्भात अनेक प्रश्न आहेत. सोशल मीडियावर फॉरवर्ड होणा-या चुकीच्या माहितीमुळे अनेकांमध्ये भीतीचेवातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामन्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी  महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सोशल मीडियाचेच माध्यम निवडले असून, व्हॉट्स अ‍ॅपवर स्टेट कोविड हेल्पलाइन सुरू केली आहे. ही सेवा विनामूल्य असून, सध्या पसरलेल्या कोविड-१९ साथीबद्दल अचूक, विश्वासार्ह व अद्ययावत माहिती मिळवण्याचा केंद्रीय स्रोत म्हणून ही हेल्पलाइन काम करणार आहे.     व्हॉट्स अ‍ॅपवरील ही कोविड महाराष्ट्र हेल्पलाइन वापरण्यासाठी केवळ +९१ २० २६१२ ७३९४ हा क्रमांक आपल्या फोन कॉण्टॅक्ट्समध्ये सेव्ह करावा आणि मग असा  मेसेज या क्रमांकावर पाठवावा. ही हेल्पलाइन सेवा सुरू होईल. ही सेवा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांत उपलब्ध होणार आहे. कोविड हेल्पलाइन महाराष्ट्र ही एक स्वयंचलित   चॅटबोटसेवा असून, याद्वारे नागरिकांच्या कोरोना विषाणूसंदभार्तील प्रश्नांना सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे २४ तासांच्या आत खात्रीशीर उत्तरे दिली जात आहेत. सुरुवातीला ही सेवा कोरोना विषाणू प्रतिबंध व लक्षणे, महाराष्ट्र सरकारतर्फे पुरवले जाणारे सहाय्य आणि सामान्यपणे आढळणारे गैरसमज यांबद्दल माहिती पुरवित आहे. भविष्यकाळात आणखी काही पयार्यांचा यात समावेश केला जाईल. व्हॉट्सअ?ॅपचे भारतातील प्रमुख अभिजित बोस म्हणाले, कोरोना विषाणूच्या साथीचा सामना करण्यासाठी विश्वासार्ह माहितीचा स्रोत उपलब्ध होणे खूप महत्त्वाचे आहे आणि याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटत आहे. या साथीच्या काळात वापरकर्त्यांनी कोणत्याही माहितीसाठी खात्री करून घेतलेल्या स्रोतांवर अवलंबून राहावे यासाठी आम्ही प्रोत्साहन देतो.--------------------------------------------------------------------------------------------सध्याच्या आव्हानात्मक काळात आम्ही नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करत आहोत. त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपवरील कोविड हेल्पलाइन महाराष्ट्रवर संदेश पाठवून संदर्भाची पडताळणी करावी आणि शंकांचे निरसन करावे. याबाबत महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शन मिळवावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे---------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यState Governmentराज्य सरकार