शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
3
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
4
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
5
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
6
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
7
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
8
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
9
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
10
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
11
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
12
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
13
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
14
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
15
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
16
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
17
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
18
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
19
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
20
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा

मने स्वच्छ असतील तर देश स्वच्छ होईल

By admin | Updated: November 26, 2015 03:01 IST

‘स्वच्छ भारत’ हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. मात्र, सर्वांची मने स्वच्छ होणार नाहीत, तोपर्यंत देश स्वच्छ होणार नाही. त्यासाठी प्रत्येकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले

पुणे : ‘स्वच्छ भारत’ हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. मात्र, सर्वांची मने स्वच्छ होणार नाहीत, तोपर्यंत देश स्वच्छ होणार नाही. त्यासाठी प्रत्येकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले गेले पाहिजे आणि संवादाचा पूल बांधला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांनी येथे केले.तीन विवेकवाद्यांची हत्या, देशातील असहिष्णू वातावरण, साहित्यिक, कलावंतांच्या पुरस्कार परत करण्याच्या भूमिका या पार्श्वभूमीवर गुजरातमधील ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी आणि अन्य नऊ साहित्यिकांनी ‘दक्षिणायन’ हे अभियान सुरू केले आहे. अभियानाची सुरुवात पुण्यापासून झाली. त्यात पाडगावकर अध्यक्षस्थानी होते. कोल्हापूर आणि धारवाडमध्येही हे अभियान राबवले जाणार आहे.पाडगावकर म्हणाले, पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक, कलावंतांनी भारतीय भाषांमध्ये झोकून देऊन काम केले आहे. याआधी देशात जेव्हा जेव्हा वाईट घटना घडल्या, तेव्हा भारतातील या सर्वांनी त्याविरोधात आंदोलने केली, लेखणीतून निषेध नोंदवला. वक्तव्य करणाऱ्यापेक्षा त्याविरोधात आंदोलने करणाऱ्यांमुळेच देशाची जास्त बदनामी होते याचा गांभीर्याने विचार व्हावा, असे आवाहन पाडगावकर यांनी केले. ‘दक्षिणायन’मध्ये गुजरातमधून गणेश देवी, अनिल जोशी, उत्तम परमार, परेश नायक, प्रबोध पारीख, मानिशी जानी, कानजी पटेल, सचिन केतकर तसेच महाराष्ट्रातून विद्या बाळ, प्रज्ञा दया पवार, ज्योती सुभाष, राजन खान, अतुल पेठे, मुकुंद टाकसाळे, गणेश विसपुते, संदेश भंडारे, इब्राहिम अफगाण आदी सहभागी झाले.