शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

कॉसमॉस दरोड्यातील आरोपींचा चेन्नईतील सिटी युनियन बँक लूटीत सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 21:11 IST

कॉसमॉस बँकेवर पडलेल्या सायबर हल्ल्यातील अटक करण्यात आलेल्या चार आरोपींचा चेन्नईतील सिटी युनियन बँकेवरील सायबर हल्ल्यातही सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्देआरोपींच्या कोठडीत वाढ : चेन्नईतील सायबर दरोड्यात ३४ कोटींची लुट कॉसमॉस प्रकरणात सायबर पोलिसांनी केलेल्या पत्रव्यवहाराला फ्रान्स, हाँगकाँग यांसह तीन देशांचा प्रतिसाद

पुणे : कॉसमॉस बँकेवर पडलेल्या सायबर हल्ल्यातील अटक करण्यात आलेल्या चार आरोपींचा चेन्नईतील सिटी युनियन बँकेवरील सायबर हल्ल्यातही सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या आरोपींच्या पोलीस कोठडीत २२ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश मंगळवारी न्यायालयाने दिला. फहीम मेहफूज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्पलेक्स भिवंडी), फहीम अझिम खान (वय ३०, रा. सिमा हॉस्पिटलच्या मागे, आझादनगर, सिल्लोड, औरंगाबाद), शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (वय २८, रा. आयेशा मस्जिद जवळ, मिर्झा कॉलनी, सिल्लोड, औरंगाबाद), महेश साहेबराव राठोड (वय २२, रा. धावरीतांडा, ता. भोकर, जि. नांदेड) अशी पोलीस कोठडीत वाढ झालेल्या आरोपींची नावे आहेत. नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय ३४, साईकृपा अपार्टमेंट, नारंगी रस्ता, विरार ईस्ट, मूळ रा. कुलीना, ओरीसा), मोहम्मद सईद इक्बाल हुसेन जाफरी उर्फ अली (वय ३०, रा. घर नं. २६, हमालवाडा, दर्गा रस्ता, भिवंडी), युस्टेस अगस्टीन वाझ उर्फ अँथनी (वय ४१, मजाद, जोगेश्वरी ईस्ट मुंबई) हे आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. यातील आरोपी फहीम खान, शेख मोहम्मद अब्दुल जब्बार, नरेश महाराणा आणि युस्टेस वाझ या आरोपींचा चेन्नईमधील सिटी युनियन बँकेवर झालेल्या सायबर दरोड्यातही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहेत. याप्रकरणी चेन्नईत ३३.९३ कोटी रुपयांची रक्कम सायबर दरोड्यात लुटल्या गेली होती. आरोपी फहीम याचे कॅनरा बँकेतील खाते सील करण्यात आले आहे. आरोपींकडून ५ लाख ५५ हजार ४०० रुपयांची रोकड, ९ मोबाईल, १८ हार्ड डिस्क, डीव्हीडी, ३ पेन ड्राईव्ह, सिमकार्ड, लॅपटॉप आणि एका आरोपीच्या बँक खात्यातील ४८ हजार रुपये गोठविण्यात आले आहेत. कुणाल शुक्ला आणि अब्दुल भाई यांच्यावर गुन्हा दाखल आहे. सायबर हल्ल्यात कॉसमॉस बँकेतील ४२ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम लुटल्या गेली आहे. त्यातील अडीच कोटी रुपयांचे व्यवहार भारतात झाले आहेत. तपासात २८ देशांमधील २३७ बँकांना कॉसमॉस बँकेतून चोरीला गेलेल्या पैशांची माहिती इंटरपोलला देण्यात आली आहे. त्यांच्याकडून अद्याप माहीती मिळालेली नसल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. हा गुन्हा आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा असल्याने त्याचा मूळ सूत्रधार शोधायचा आहे, आरोपींनी गोपनीय माहिती कशी हस्तगत केली याची माहिती मिळविण्यासाठी आणि चेन्नई आणि पुण्यातील सायबर दरोड्या प्रमाणे आरोपींनी इतर गुन्हे केले तर नाही ना, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. ............चेन्नईचा सायबर दरोडा झाला उघडकॉसमॉसवरील सायबर दरोड्यातील आरोपींना पडकल्यानंतर पुणे पोलिसांनी चेन्नई पोलिसांकडून तेथील दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज मागविले. त्यात कॉसमॉसमधील दरोड्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे चन्नई येथील दरोडा देखील उघड झाला.नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय ३४, रा. विरार), शेख महम्मद अब्दुल जब्बार (वय २८, रा. संभाजीनगर), फहिम अझीम खान (वय ३०, रा. संभाजीनगर) आणि अँथनी या चौघांनी चेन्नईतील सिटी बँकेतील पैसे क्लोनिंग (बनावट) केलेल्या कार्डनी काढले असल्याची माहिती सायबर शाखेच्या उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग यांनी दिली. डिसेंबर २०१७मध्ये चेन्नई येथील सिटी युनियन बँकेचे सर्व्हर हॅक करून ३३ कोटींहून अधिक रुपये एटीएममधून काढण्यात आले होते. या प्रकरणात गेल्या नऊ महिन्यांत चेन्नई पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. पुणे पोलिसांनी चेन्नई पोलिसांना येथील घटनांचे सीसीटीव्ही फुटेज मागवून तपासले. त्यात नरेश, फहिम, शेख महम्मद आणि अँथनी या चौघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत चेन्नई पोलिसांना कळविण्यात आले असून, पुण्यातील तपास पूर्ण झाल्यानंतर या आरोपींना त्यांच्याकडे हस्तांतरित केले जाणार आहे. कॉसमॉस प्रकरणात सायबर पोलिसांनी केलेल्या पत्रव्यवहाराला फ्रान्स, हाँगकाँग यांसह तीन देशांनी प्रतिसाद दिला असून, त्यांनी गुन्ह्याची जास्तीची माहिती मागवून घेतल्याची माहिती देखील ज्योतीप्रिया सिंग यांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमArrestअटकPoliceपोलिसbankबँक